भुसावळ येथे शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:36 PM2018-12-24T14:36:13+5:302018-12-24T14:37:27+5:30

प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला.

Professor of credit at Bhusawal | भुसावळ येथे शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव

भुसावळ येथे शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव

Next
ठळक मुद्देपाल्य, जिल्हा परिषद तसेच राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मानसंस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


भुसावळ, जि.जळगाव : शिक्षकांची प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे सभापती कैलास तायडे होते. प्रमुख पाहुणे उपसभापती नीलेश पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वालनाने झाली. प्रास्ताविक उपसभापती नीलेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकात उपस्थित गुणगौरव सोहळ्यासाठी असलेल्या सभासद पाल्यांचा, आदर्श शिक्षक व वरिष्ठ पदावर गेलेले शिक्षक सत्कार सोहळा व कर्मचारी पाल्य यांचा समावेश असतो, याचे विवेचन केले.
पाल्य तसेच शिक्षकांचा सत्कार संचालक मंडळातर्फे करण्यात आला. शिक्षक प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
एस. टी.चौधरी यांनी सोसायटीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक प्रदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभापती कैलास तायडे यांनी सोसायटीच्या निर्णयांची माहिती दिली.
रवी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर आभार संचालक मधुकर लहासे यांनी मानले. यावेळी संचालक गंगाराम फेगडे, सुरेश इंगळे, कृष्णा सटाले, मधुकर लहासे, प्रदीप सोनवणे, एस.टी.चौधरी, भूषण चौधरी, हरीश बोंडे, विजय कोल्हे, विनोद पाटील, शोभा इंगळे उपस्थित होते.
 

Web Title: Professor of credit at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.