झोपेत असताना प्राध्यापकाचे चार मोबाईल लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:46 PM2020-05-19T12:46:04+5:302020-05-19T12:46:15+5:30
जळगाव : रात्रीच्यावेळी गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबाचे रात्रीतूनच त्यांच्याजवळ ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघड आली. याप्रकरणी ...
जळगाव : रात्रीच्यावेळी गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबाचे रात्रीतूनच त्यांच्याजवळ ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघड आली. याप्रकरणी शैलेश हिरालाल लुंकड (२५, रा. रामनगर, मेहरुण) यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश हा तरुण खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला असून रामनगरात आई, वडीलांसह वास्तव्याला आहे.
१५ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण गच्चीवर झोपायला गेले. सोबत चार मोबाईलही नेले होते. उशीजवळ मोबाईल ठेवून सर्व कुटुंब झोपले. सकाळी ४ वाजता नळाला पाणी येणार असल्याने शैलेश उठला असता एकही मोबाईल जागेवर नव्हता. या मोबाईलची किंमत १८ हजाराच्यावर आहे.
चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सचिन पाटील करीत आहेत.