एक गाव एक वाण अभियानअंतर्गत हरताळा येथे कृषी विभागातर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:27+5:302021-05-28T04:13:27+5:30
हरताळ्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक प्रकारचे वाण घेण्याचे फायदे या कार्यक्रमात सांगण्यात आले. याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ...
हरताळ्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक प्रकारचे वाण घेण्याचे फायदे या कार्यक्रमात सांगण्यात आले.
याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी एक गाव एक वाण संदर्भात विविध फायदे शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. तसेच विशिष्ट बियाणे, औषधे व खत संयुक्तरित्या मागणी करून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. जिनिंगचालकांना एका प्रतीचा कापूस मिळाल्यास त्याचा अधिक फायदा शेतकऱ्यांना मिळतो, असे त्यांनी सांगितले.
आत्मा प्रकल्प उपसंचालक यांनी कापूस बियाण्यासाठी खताचे नियोजन या विषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार, कृषी सहाय्यक कीर्तिकुमार खंडारे, कृषी सहाय्यक तात्या कारंडे तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव देशमुख, सरपंच प्रकाश कोळी, उपसरपंच नामदेव भड, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर रहाणे, माजी सरपंच समाधान कार्ले, पंढरी मुलांडे, निवृत्ती भड, महेश शेळके, शंकर चिखलकर, गोपाळ उद, किसन चव्हाण, अर्जुन शेळके, सोपान दांडगे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.