मेक्सिको विद्यापीठासोबत उमवि राबविणार उपक्रम
By admin | Published: January 17, 2017 12:49 AM2017-01-17T00:49:42+5:302017-01-17T00:49:42+5:30
आदान-प्रदान : कुलगुरु यांची संचालिकेसोबत चर्चा
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मेक्सिको येथील सेटीस विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने सोमवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी मेक्सिको विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजच्या संचालिका दार डायना रुईज इस्थर वुलफोक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान उमवि व मेक्सिको विद्यापीठाच्या सामंजस्याने नवीन उपक्रम राबविण्याचे ठरले आहे.
प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.क:हाड, प्रा.डी.एस.पाटील, डॉ.समीर नारखेडे आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सेटीस विद्यापीठासमवेत सामंजस्य करार यापूर्वीच केला आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझीनेस स्टडीजच्या संचालिका दार डायना रुईज इस्थर वुलफोक यांनी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांची सोमवारी भेट घेतली. त्यांच्यासोबत उमविच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉ.सीमा जोशी उपस्थित होत्या. डॉ.सीमा जोशी यांनी संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि व्यवस्थापनशास्त्र या तिन्ही विषयांच्या अनुषंगाने दोन्ही विद्यापीठांना नवे प्रकल्प राबविता येणार आहेत.
मेक्सिको विद्यापीठातील शिक्षक करणार मार्गदर्शन
करारांतर्गत ऑनलाईन तासिका, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व शिक्षक अदान-प्रदान, संयुक्त प्रकाशन हे उपक्रम राबविण्याचे या बैठकीत ठरले आहे. मेक्सिको विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकशास्त्र या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करण्याचे तसेच या विद्यापीठातील तज्ज्ञांना मेक्सिकोतील विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यासाठी पाठविण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. समर प्रोजेक्ट अंतर्गत मेक्सिको येथे पुढील वर्षी उमवि तसेच संलगिAत महाविद्यालयातील इच्छुक विद्याथ्र्याना पाठविण्याचेही यावेळी ठरले आहे.