बंदीस्त नाट्यगृहाच्या चाचणीसाठी कार्यक्रम आयोजित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:03 PM2018-04-06T23:03:10+5:302018-04-06T23:03:10+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यकर्मींसोबत चर्चा

 The program will be organized for the screening of new theaters | बंदीस्त नाट्यगृहाच्या चाचणीसाठी कार्यक्रम आयोजित करणार

बंदीस्त नाट्यगृहाच्या चाचणीसाठी कार्यक्रम आयोजित करणार

Next
ठळक मुद्दे बंदिस्त नाट्यगृहाची केली पाहणी नाट्यकर्र्मींनी केल्या सूचना

जळगाव: जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाºया बंदिस्त नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी शुक्रवार, ६ रोजी या नाट्यगृहाची पाहणी शहरातील नाट्य, संगीत, कला, पथनाट्य आदि क्षेत्रातील मान्यवरांसोबत केली. यावेळी या नाट्यगृहाच्या चाचणीसाठी एक दिवसीय महोत्सव आयोजित करावा की ३ दिवसीय महोत्सव आयोजित करावा? याबाबत चर्चा झाली.
यावेळी जिल्हाधिकाºयांसमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, श्रीपाद जोशी, शंभू पाटील, शिरीष बर्वे, हर्षल पाटील, विनोद ढगे, अर्पणा भट, दीपक चांदोरकर, आकाश बावीस्कर, अनिल जोशी, विनोद रापतवार, उदय महाजन, सरिता खाचणे, पुरुषोत्तम चौधरी, होनाजी चव्हाण, विनोद बियाणी, दिलीप तिवारी, हर्षल पाटील, शमा सुबोध यांच्यासह महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना नाट्यृहात आणखी काही सुविधा राहून गेल्या आहेत का? यादृष्टीने नाट्यगृहाचे झालेले काम दाखविण्यात आले. त्यात साऊंड सिस्टीम, लाईट व्यवस्था तपासण्यात आली. मात्र तरीही उद्घाटनापूर्वी या नाट्यगृहाची चाचणी व्हावी यासाठी कार्यक्रम कसा आयोजित करावा? याबाबत चर्चा झाली. काहींनी व्यावसायिक नाटक आणण्याची सूचना केली. मात्र पहिल्याच कार्यक्रमाला पैसे खर्चून नागरिक मोठ्या संख्येने आले नाही तर? त्याऐवजी सर्वांसाठी खुला असलेला कार्यक्रम आयोजित करावा, असे मत पुढे आले. त्यातही एक दिवसाचा महोत्सव घ्यावा की ३ दिवसांचा यावर चर्चा झाली. एकाच दिवशी नाट्य, गायन, नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचनाही करण्यात आली. यावर आता कलावंतांनीच चर्चा करून निर्णय घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. उपस्थितांनी बंदिस्त नाट्यगृहाचे झालेले काम बघून समाधान व्यक्त केले. तसेच शहरात भव्यदिव्य असे नाट्यगृह झाल्याबद्दल सर्व उपस्थितांच्यावतीने श्रीपाद जोशी यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शंभू पाटील यांनी आभार मानले.
------
या मांडल्या सूचना
उपस्थितांनी सुचना करतांना नाट्यगृहात बालगंधर्व यांचे तैलचित्र लावणे, स्टेजच्या वर नटराजाची मूर्ती लावून त्याखाली संस्कृत श्लोक लिहावा, विंगेची रूंदी वाढवावी, नाट्यप्रेमींच्या वाहनांसाठी नाट्यगृहाच्या बाहेरील मोकळया मैदानात पार्कींगची व्यवस्था करावीे, शहरातील नाट्य कलावंताना आपले कार्यक्रम करण्यासाठी माफक दरात नाट्यगृह उपलब्ध करुन देण्यात यावे. नाट्यगृहात आर्ट गॅलरी उभारण्यात यावी. तसेच प्रायोगिक तत्वावर स्थानिक कलाकारांचा एक दिवसाचा कलामहोत्सव घेण्यात यावा, अशा विविध सुचना केल्या.

Web Title:  The program will be organized for the screening of new theaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.