निषेधाचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:39 PM2019-02-16T21:39:58+5:302019-02-16T21:40:14+5:30

घोषणा देत युवक उतरले रस्त्यावर

Prohibition closure | निषेधाचा बंद

निषेधाचा बंद

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांसह हमाल, कामगारांचाही सहभाग ; २०० कोटींची उलाढाल ठप्प



जळगाव-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ शनिवारी शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होती. तसेच शहरात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेधार्थ पाकीस्तानचे झेंडे जाळण्यात आले, तसेच अनेक युवकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यांवर येवून ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देताना दिसून आले.

सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हाच संताप शनिवारी जळगावच्या तरुणांमध्ये दिसून आला. कोठल्याही पुर्वघोषणेशिवाय, कोणाच्याही दबावात किंवा कोणाच्याही सूचनेशिवाय केवळ स्वयंस्फुर्तीने जळगावकरांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ कडकडीत बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेतला. व्यापारी, हमाल, कामगारांसह सर्वच स्तरावरील व्यावसायीकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.

दाणाबाजारात कडकडीत बंद
दाणा बाजार असोसिएशनकडून देखील शनिवारी बंद पुकारण्यात आला. सकाळी १० वाजता दाणाबाजारातील सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येवून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये व्यवहार थांबवण्यात आले आहेत. नागरिकांसह व्यापाºयांनी स्वेच्छेने हा बंद पाळून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. शनिवार हा बाजाराचा दिवस असतानाही दाणा बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे तब्बल १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारीया यांनी दिली.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी दणाणले गोलाणी मार्केट
गोलाणी मार्केटमध्येही सर्व व्यापारी व व्यावसायीकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व व्यावसायीक मार्केटमध्ये एकत्र येवून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘वंदे मातरम, भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी गोलाणी मार्केट दणाणून निघाले होते. सर्व व्यापारी बांधवांकडून यावेळी आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील बंद मध्ये सहभागी असलेल्या युवकांनी घेतली.

Web Title: Prohibition closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.