शेती मशागत करण्यास मज्जाव, पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:09+5:302021-07-16T04:13:09+5:30

मनीषा विलास साळुंखे (लोण) यांनी वावडे येथील गणेश रघुनाथ पाटील यांची शेती कसण्यासाठी घेतली होती. त्याबाबत न्यायालयात वाद जाऊन ...

Prohibition on cultivation, crime against five persons | शेती मशागत करण्यास मज्जाव, पाच जणांविरुद्ध गुन्हा

शेती मशागत करण्यास मज्जाव, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next

मनीषा विलास साळुंखे (लोण) यांनी वावडे येथील गणेश रघुनाथ पाटील यांची शेती कसण्यासाठी घेतली होती. त्याबाबत न्यायालयात वाद जाऊन कनिष्ठ व वरिष्ठ न्यायालयात निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यामुळे ११ रोजी मनीषा, त्यांचे पती विलास साळुंखे व दिर दिनेश साळुंखे हे शेती मशागत करण्यासाठी जात असताना नीळकंठ रघुनाथ पाटील, दिगंबर रघुनाथ पाटील, गणेश रघुनाथ पाटील, पूनम नीळकंठ पाटील आणि संभाजी हरी पाटील यांनी त्यांचे ट्रॅक्टर अडवून आम्ही स्टे ऑर्डर आणणार आहोत. तुम्ही शेती करू नका, असे म्हणून अश्लील शिवीगाळ व मारहाण केली तसेच शेती करण्यास मज्जाव केला.

मनीषा साळुंखे यांच्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल विशाल चव्हाण करीत आहेत.

Web Title: Prohibition on cultivation, crime against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.