जळगावात राष्टÑवादीतर्फे मौनव्रताने शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:31 PM2018-10-03T13:31:25+5:302018-10-03T13:32:11+5:30
धरणे आंदोलन
जळगाव : राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर मौनव्रत पाळत धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे देश व राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. तर कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महात्मा गांधी यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य व लोकशाही भाजपाच्या प्रतिगामी धोरणामुळे धोक्यात आली आहे. या संदर्भात राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सकाळी ९ वाजेपासून महात्मा गांधी उद्यासमोरील महात्मा गांधी यांच्यापुतळ्या समोर धरणे आंदोलनासाठी एकत्र आले होते. दुपारी १२ पर्यंत मौनव्रत होते.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, विजया पाटील, मंगला पाटील, अरविंद मानकरी,वाल्मीक पाटील, नामदेव चौधरी, वाय.एस. महाजन, योगेश देसले, राहूल सोनवणे, रोहन सोनवणे, प्रा. एन.डी.पाटील, अॅड. राजेश गोयर, अॅड. कुणाल पवार, डॉ. सुभाष देशमुख, राजेश पाटील, विकास पवार, कल्पिता पाटील, मिनल पाटील, राजेश पाटील, संजय चव्हाण, रोहन पाटील, सविता बोरसे,लता मोरे, माधुरी पाटील, मिनाक्षी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.