पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे रथ मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:16 PM2019-04-16T22:16:08+5:302019-04-16T22:19:17+5:30

पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे यंदाही बालाजी महाराज रथोत्सव मिरवणूक मंगळवारी उत्साहात पार पडली. चैत्र शुद्ध एकादशीला बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.

Promoting chariot procession in Parolola taluka, Mahalpur | पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे रथ मिरवणूक उत्साहात

पारोळा तालुक्यातील महाळपूर येथे रथ मिरवणूक उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देदर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दीबालाजी महाराजांचा जयघोष

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील महाळपूर येथे यंदाही बालाजी महाराज रथोत्सव मिरवणूक मंगळवारी उत्साहात पार पडली. चैत्र शुद्ध एकादशीला बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.
दुपारी ३. ३५ वाजेच्या मुहूर्तावर रथ बालाजी मंदिराच्या परिसरातून हलविण्यात आला. यंदा रथपूजेचा मान हेमंत दंगल पाटील यांना देण्यात आला. या वेळी पारोळा येथील नगराध्यक्ष करण पाटील, उद्योगपती सुधाकर पाटील, संजय पाटील, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील आदींनी दर्शन घेतले.
लक्ष्मी रमना गोविंद बालाजी महाराज की जय... असा घोष करीत मिरवणूक पुढे पुढे जात होती.
या संस्थानाची जबाबदारी परंपरेनुसार योगेश किसन पाटील व सुभाष नामदेव पाटील यांचे कुटुंब पाहत आहे.
रथाला मोगऱ्या लावण्याचे काम भोमटू भोई, मोहन भोई, लोहार, वाणी यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी पंच रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, सुधाकर पाटील, संजय चौधरी, संतोष पाटील, गणेश पाटील, हरिकृष्णा पाटील, रघुनाथ पाटील, शांताराम पाटील, महादू थोरात आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Promoting chariot procession in Parolola taluka, Mahalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.