मतदान केंद्रांवर प्राथमिक सुविधांची योग्य व्यवस्था असावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 09:20 PM2019-09-28T21:20:47+5:302019-09-28T21:21:45+5:30

मागणी : शिक्षक भारती संघटनेतर्फे निवेदन

 Proper facilities should be provided at polling stations! | मतदान केंद्रांवर प्राथमिक सुविधांची योग्य व्यवस्था असावी!

मतदान केंद्रांवर प्राथमिक सुविधांची योग्य व्यवस्था असावी!

Next

जळगाव- मतदान केंद्रावर प्राथमिक सुविधांची योग्य व्यवस्था करावी तसेच निवडणूक कामासाठी नियुक्त शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी नुकतीच शिक्षक भारती संघटनेच्यावतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नुकतीच शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती़ त्यामध्ये माध्यमिक जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, प्राथमिक जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, अजय पाटील आदींचा समावेश होता़ यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.

अशा आहेत मागण्या
निवडणूक कामात येणारे देण्यात येणारे आदेश पद सेवेचा अनुभव वेतन यानुसार देण्यात यावे, नोकरी करित असलेल्या विधानसभा सोडून इतर ठिकाणी नियुक्ती करायची असल्यास जाण्याची पूर्ण व्यवस्था करावी, मतदान केंद्रावर प्राथमिक सुविधांसाठी योग्य ती व्यवस्था असावी, महिला कर्मचाºयांची नियुक्ती मुख्यालयाजवळ करण्यात यावी, निवडणूक काळातीलक कर्मचाºयांच्याप्रती अपमान वागणूक थांबवावी मानधान तात्काळ व रोखीने वितरीत करावे, राखीव कर्मचाºयांचे मानधन मतदान संपाच्या वेळी अगोदर अदा करण्यात यावे, मतदान साहित्य जमा करताना कर्मचाºयांची होणारी हेळसांड थांबवावी, मतदानाच्या दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशा आदी मागण्या शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

Web Title:  Proper facilities should be provided at polling stations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.