जिल्ह्यात अतिलठ्ठ मुलांचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:09+5:302021-03-10T04:17:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात फक्त १० मुले चार किलोपेक्षा जास्त वजनाची जन्माला आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात फक्त १० मुले चार किलोपेक्षा जास्त वजनाची जन्माला आली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन वर्षात जन्माला आलेली बहुतांश मुलेही सरासरी वजनाची आहेत. त्यातील काही गर्भवती महिलांना मधुमेहाची लागण झाली असेल तर किंवा अतिपोषण झाले असेल तर मुले चार किलोपेक्षा जास्त वजनाची असतात.
जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलांच्या बाळांपैकी फक्त १० मुले गेल्या दोन वर्षात म्हणजे २०१९ आणि २०२० यात चार किलोपेक्षा जास्त वजनाची जन्माला आली आहे. मुलाचे वजन जर २ किलो ७०० ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर ते पुरेसे वजन मानले जाते. त्यापेक्षा कमी असेल तर त्या बाळाला कमी वजनाचे मानले जाते. त्याचप्रमाणे वजन चार किलोपेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठ मानले जाते. जिल्ह्यात लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण तसे अत्यल्प आहे. दर वर्षी साधारणत: चार किंवा पाच बालके अशी जन्माला येतात.
गर्भवती महिलांनाच मधुमेह
२०१९ मध्ये पाच आणि २०२० मध्ये पाच बालके ही लठ्ठ जन्माला आली होती. त्यातील २०२० मध्ये दाखल झालेल्या गर्भवती महिलांनाच मधुमेहाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या बाळांचे वजन हे अनावश्यक वाढले होते. तर काही प्रसंगी अतिपोषण झाल्यानेदेखील मुले लठ्ठ जन्माला येऊ शकतात.
कोट - मातेलाच जर मधुमेह झाला असेल तर मुले लठ्ठ जन्माला येऊ शकते. त्यासोबत त्याची इतर कारणेदेखील असतात. वर्षभरात साधारणत: पाच ते सहा मुले ही जन्मत: चार किलोपेक्षा जास्त वजनाची असतात. - डॉ. संजय बनसोडे, बालरोग तज्ज्ञ
एकही मूल पाच किलोपेक्षा जास्त नाही
जिल्हा सरकारी रुग्णालयात झालेल्या प्रसूतींपैकी एकही मूल पाच किलोपेक्षा जास्त वजनाचे आढळून आलेले नाही. बहुतेक अतिवजनाची मानली गेलेली बालकेदेखील चार किलोपेक्षा जास्त नव्हती. त्यातील फक्त दहाच बालके ही पाच किलो वजनाची आहेत.