153 विंधन विहिरींचे प्रस्ताव
By admin | Published: September 15, 2015 07:10 PM2015-09-15T19:10:48+5:302015-09-15T19:10:48+5:30
जिल्ह्यात सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप पाहता टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आह़े
धुळे : जिल्ह्यात सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप पाहता टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आह़े संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सप्टेंबर 2015 ते मे 2016 र्पयतचा उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखडय़ावर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिका:यांच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला़ जिल्ह्यातून सर्वाधिक 153 विंधन विहिरींचा प्रस्ताव दाखल झाला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सोमवारी टंचाईबाबत बैठक घेण्यात आली़ या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होत़े टंचाईबाबत उपाययोजनांनुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झालेली माहिती बैठकीत सादर करण्यात आली़ विशेष म्हणजे सप्टेंबर 15 ते मे 16 या कालावधीत प्रत्येक महिन्यात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला़ विंधन विहिरी तर काही ठिकाणी कूपनलिका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सप्टेंबर 2015 मध्ये 1, ऑक्टोबर महिन्यात 37, नोव्हेंबर महिन्यात 5, डिसेंबर महिन्यात 7, जानेवारी 2016 मध्ये 17, फेब्रुवारीत 19, मार्चमध्ये 45, एप्रिलला 17 आणि मे महिन्यात 5 ठिकाणी विंधनविहिरी; अशा एकूण 153 ठिकाणी ही उपाययोजना घेण्याचे प्राथमिक स्तरावर निश्चित करण्यात आले आह़े नळ योजना विशेष दुरुस्तीचे काम सप्टेंबर महिन्यात एकही घेण्यात आलेले नाही़ ऑक्टोबर 15 मध्ये 9, नोव्हेंबर महिन्यात 4, जानेवारी 2016 मध्ये 2, मार्च महिन्यात 3 आणि एप्रिल 16 मध्ये 5 अशा एकूण 23 ठिकाणी नळ योजनांची विशेष दुरुस्ती होणार आह़े तात्पुरती पूरक योजना लक्षात घेतल्यास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी 8, डिसेंबर महिन्यात 16, जानेवारी 2016 मध्ये 7, फेब्रुवारी महिन्यात 4, मार्च महिन्यात 14 आणि एप्रिल 16 मध्ये 2 असे एकूण 59 प्रस्ताव तात्पुरत्या पूरक योजनेचे आहेत़ खासगी विहिरी अधिग्रहीत करणे या योजनेत सप्टेंबर महिन्यात 13, ऑक्टोबर महिन्यात 16, नोव्हेंबर महिन्यात 12, डिसेंबर महिन्यात 20, जानेवारी 2016 मध्ये 34, फेब्रुवारी महिन्यात 17, मार्च महिन्यात 47, एप्रिल महिन्यात 31 आणि मे 16 या महिन्यात 2 असे एकूण 192 ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार आह़े विहीर खोल करणे आणि त्यातील गाळ काढणे याचेदेखील मोठय़ा प्रमाणावर प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यानुसार सप्टेंबर महिन्यात 1, ऑक्टोबर महिन्यात 47, नोव्हेंबरमध्ये 15, डिसेंबर महिन्यात 17, जानेवारी 2016 मध्ये 40, फेब्रुवारी महिन्यात 11, मार्च महिन्यात 62, एप्रिलमध्ये 44 आणि मे महिन्यात 5 अशा एकूण 242 ठिकाणी विहिरी खोल करण्यात येणार आहेत़ काही विहिरींचा गाळदेखील काढण्यात येणार आह़े बुडक्या घेण्याच्या कामांचे नियोजनदेखील झाले आह़े त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबरमध्ये 2 आणि डिसेंबर 2015 ते मार्च 2016 या कालावधीत प्रत्येकी 1 याप्रमाणे 7 ठिकाणी ही उपाययोजना होणार आह़े टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन देखील आखण्यात आले आह़े त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात 18, ऑक्टोबर महिन्यात 5, नोव्हेंबर महिन्यात 2, डिसेंबरमध्ये 3, जानेवारी 2016 मध्ये 30, फेब्रुवारी महिन्यात 4, मार्च महिन्यात 7 आणि एप्रिल महिन्यात 29 अशा एकूण 98 ठिकाणी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आह़े प्रगतीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे काम 8 ठिकाणी निश्चित करण्यात आले आह़े त्यानुसार मार्च 2016 या महिन्यात 2 आणि एप्रिल 16 या महिन्यात 6 ठिकाणचा समावेश करण्यात आला आह़े