युतीसाठी स्वत:हून सेनेला प्रस्ताव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 12:47 AM2017-01-20T00:47:50+5:302017-01-20T00:47:50+5:30
गिरीश महाजन : युतीसाठी प्रदेशस्तरावरुन सूचना
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेना यांची युती करण्यासाठी प्रदेश भाजपाकडून सूचना आहेत. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवसात आम्ही स्वत:हून शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव देणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. नोटाबंदी लागू झाल्यानंतरही जनतेने आम्हाला जिल्ह्यासह राज्यात विजयी कौल दिला आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहून आघाडीचे नेते हे हतबल झाले आहेत. जिल्ह्यात युती झाली किंवा नाही झाली तरी जिल्हा परिषदेत आम्ही 40 पेक्षा अधिक जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
भाजपाचे सव्रेक्षण सुरू
इच्छुकांच्या मुलाखती 21 तारखेर्पयत होणार आहे. भाजपा कार्यकत्र्यामध्ये युती करण्याबाबत संमिश्र भावना असल्याचे महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यातील गट आणि गणांमध्ये सव्रेक्षण करण्यात येत आहे. आगामी तीन दिवसात सव्रेक्षणाची आकडेवारीदेखील येणार आहे. त्यानंतर भाजपामार्फत शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.