जळगावातील खुल्या जागा संस्थांना देण्याचे ठराव रद्दचा प्रस्ताव
By admin | Published: April 24, 2017 04:50 PM2017-04-24T16:50:55+5:302017-04-24T16:50:55+5:30
जळगाव शहरातील 213 विकसित जागांबाबत महासभेत होणार निर्णय. अविकसित 184 जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू
Next
जळगाव,दि.24- तत्कालीन नगरपालिकेने तसेच महापालिकेने मनपा हद्दीतील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागा विविध संस्थांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यासाठी अटी-शर्त्ीवर दिल्या होत्या. मात्र त्या संस्थांकडून अटीशर्त्ीचा भंग झाला असल्याने अद्याप विकिसित न झालेल्या 184 जागा परत घेण्याची जागा यापूर्वी झालेल्या ठरावानुसार परत घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून 213 विकसित जागा परत घेण्यासाठी जागा देण्याचे ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव येत्या 29 रोजी आयोजित महासभेत ठेवण्यात आला आहे.
तत्कालीन नगरपालिका व महानगरपालिकेच्या कार्यकाळात विविध संस्थांना बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार सार्वजनिक वापराच्या व स्थानिक रहिवाशांना उपयोगात येईल या उद्देशाने ठराव करून ओपनस्पेस विविध संस्थांना अटी-शर्त्ीवर वापरासाठी दिल्या होत्या. मात्र या जागा वितरीत करताना नगरविकास विभागाकडील 10 जून 1996 च्या आदेशामधील नमूद बाबींची पूर्तता या सर्व संस्थांमार्फत झालेली नाही. त्यामुळे 20 जून 2015 रोजीच्या महासभा ठरावानुसार ज्या संस्थांनी खुल्या जागा विकसितच केलेल्या नसतील, त्या परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. संबंधीतांना कलम 81-ब ची नोटीस बजावण्यात येत आहे.