दवाखान्यांसाठी नोंदणी फी वाढीचा प्रस्ताव
By admin | Published: January 5, 2016 01:03 AM2016-01-05T01:03:15+5:302016-01-05T01:03:15+5:30
धुळे : महापालिका क्षेत्रातील मोठय़ा दवाखान्यांना आकारण्यात येणा:या नोंदणी व नूतनीकरण फीमध्ये घसघशीत वाढ प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेकडे पाठविला आह़े
धुळे : महापालिका क्षेत्रातील मोठय़ा दवाखान्यांना आकारण्यात येणा:या नोंदणी व नूतनीकरण फीमध्ये घसघशीत वाढ करण्याबरोबरच लहान दवाखाने, पॅथॉलॉजिकल क्लिनिक, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक तसेच होमिओपॅथी दवाखान्यांनादेखील नोंदणी फी आकारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेकडे पाठविला आह़े त्यामुळे आरोग्य विभागाचे दोन स्वतंत्र विषय महासभेत चर्चेसाठी येणार आहेत़ दवाखान्यांवर होती मेहेरनजर शहरातील 170 मोठय़ा दवाखान्यांची मनपाकडे नोंदणी आह़े परंतु आतार्पयत मनपाने या दवाखान्यांवर मेहेरनजर दाखविल्याने त्यांना दररोज 0़27 पैसे (1 ते 9 खाटांर्पयत), 0़67 पैसे (10 ते 50 खाटांर्पयत), आणि 2़6 रुपये (50 खाटांपुढील) प्रतीदिनप्रमाणे नोंदणी व नूतनीकरण फी आकारण्यात येत होती़ त्यामुळे सुविधायुक्त, प्रथितयश दवाखान्यांना दरवर्षी अनुक्रमे केवळ 100, 250 व 1 हजार रुपयांर्पयत शुल्क आकारणी केली जात होती़ त्यामुळे या शुल्कात वाढ होणे आवश्यक असल्याने त्याबाबत हालचाली सुरू होत्या़ त्यानुसार आरोग्य विभागाने महासभेत हा विषय पाठविला असून त्यात पुढीलप्रमाणे वाढ सुचविली आहे- 15 रुपये (1 ते 9 खाटांर्पयत), 20 रुपये (10 ते 50 खाटांर्पयत) आणि 25 रुपये (50 खाटांपुढील) प्रतीदिऩ अशी वाढ मनपाने सुचविली असून त्यामुळे या दवाखान्यांना प्रती वर्षी अनुक्रमे पाच हजार 500, सात हजार 500 व 10 हजार इतकी नोंदणी व नूतनीकरण फी आकारणी प्रस्तावित आह़े याबाबत महासभेत चर्चा होणार असून चर्चेअंती त्यावर निर्णय घेतला जाणार आह़े ही वाढ झाल्यास मनपाचे उत्पन्न वाढणार आह़े लहान दवाखानेही घेणार ‘रेकॉर्ड’वर मुंबई नर्सिग अॅक्ट 1949 व सुधारित 2006 नुसार नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणा:या डॉक्टरांच्या दवाखान्यांच्या नूतनीकरणासंदर्भात मनपाने नाशिक मनपाकडून मार्गदर्शन मागविले होत़े मनपा नाशिक कार्यक्षेत्रात मुंबई शुश्रूषागृहे अधिनियम 1949 व सुधारित 2006 अंतर्गत मनपा हद्दीतील रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक तसेच होमिओपॅथी दवाखाने यांची नोंदणी केली जाते, असे नमूद आह़े सद्य:स्थितीत धुळे मनपाकडे कार्यक्षेत्रात केवळ ज्या रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात येते, अशाच 170 दवाखान्यांची नोंद आह़े मात्र नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शन पत्रात नमूद केल्याप्रमाणे धुळे मनपा कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक व होमिओपॅथी दवाखाने यांना फी लागू केल्यास मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकत़े मुंबई नर्सिग होम अॅक्ट 1949 मधील तरतूद 2(4) नुसार ज्या ठिकाणी आजारी व्यक्तीला वैद्यकीय सेवा दिली जाते, अशा सर्व ठिकाणांना रुग्णालय किंवा शुश्रूषागृह म्हटले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आह़े त्यानुसार धुळे मनपातही सर्व रुग्णालये, क्लिनिक, पॅथॉलॉजिकल लॅबेरोटरीज, जनरल प्रॅक्टिशनर, आयुव्रेदिक व होमिओपॅथी दवाखाने यांची नोंदणी आवश्यक असून त्यांच्याकडून या नियमातील तरतुदीनुसार प्रती वर्ष 500 रुपये फी वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेपुढे ठेवला आह़े आतार्पयत वरीलपैकी कोणत्याही दवाखान्याला तसेच आरोग्य सुविधा पुरविणा:या शुश्रूषागृहांची नोंद मनपाकडे नव्हती, त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत होत़े सदर दवाखान्यांमधील निर्माण होणा:या जैविक घनकच:यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी उक्त दवाखान्यांची नोंदणी आवश्यक आह़े