नशिराबाद नगर परिषदेचा प्रस्ताव येणार स्थायीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:36+5:302021-05-07T04:17:36+5:30
जळगाव : नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी प्रस्तावित गावे समाविष्ट करणे, न करण्यासाठी स्थायी समितीच्या ठरावाची आवश्यकता असून, ...
जळगाव : नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी प्रस्तावित गावे समाविष्ट करणे, न करण्यासाठी स्थायी समितीच्या ठरावाची आवश्यकता असून, येत्या ११ मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
११ रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. यात ४ विषय व आयत्या वेळच्या विषयावंर चर्चा होणार आहे. दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. १५ मे पर्यंत जिल्हा परिषदेत उपस्थितीवर बंधने असल्याने, शिवाय शासनाकडून सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश असल्याने ही सभाही ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
नशिराबा ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामविकास विभागाचे २१ जानेवारी रोजी पत्र प्राप्त झाले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे नगर परिषदेमध्ये प्रस्तावित केलेली गावे समाविष्ट करणे, न करणे यासाठी जि. प. स्थायी समितीचा ठराव आवश्यक आहे. प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असून, हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यासाठी स्थायी समितीची शिफारस होण्यासाठी सादर करण्यात येणार असल्याचे अजेंडात नमूद करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या मुद्दयावरून नशिराबाद ग्रामपंचायतीच्या एक सदस्य सोडून अन्य ८१ सदस्यांनी राजीनामे दिले होते. सद्यस्थिती या ठिकाणी प्रशासक असून, या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सभा वादळी
गेल्या वेळेची सर्वसाधारण सभा ही मोठी वादळी झाली होती. विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतरची ही पहिलीच सभा असून, आयत्यावेळच्या विषयावरून ही सभाही गाजण्याची शक्यता आहे.