टंचाईवर मात करण्यासाठी जळगाव जि.प.ने सादर केला २९ कोटीचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:06 PM2018-02-28T12:06:02+5:302018-02-28T12:06:02+5:30
टंचाईच्या झळा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढत असून काही गावांमध्ये जानेवारीपासून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. मे व जून महिन्यापर्यंत काही तालुक्यात पाणीटंचाईचे संकट भीषण होणार असल्याची परिस्थिती असल्याने जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे २९ कोटी ५० लाखांचा आराखडा सादर केला आहे.
गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने यावर्षी जिल्ह्यात तब्बल ८८९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. सद्यस्थितीत ६० गावांमध्ये ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च पर्यंत साधारणत: ३२७ तालुके टंचाईच्या सावटाखाली राहणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तर एप्रिल ते जून या काळात २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
अमळनेर तालुक्यात सद्यस्थितीत सर्वाधिक ३२ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जामनेर तालुक्यात १४ गावांना ११ टँकरव्दारे पाणी पुरवठा पुरविला जात आहे. तर पारोळा तालुक्यात १२ गावांना ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बोदवड व भुसावळ तालुक्याळात प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यात कंडारी, बोदवड तालुक्यात ऐनगाव, जामनेर तालुक्यात खचार्णे, सार्वे प्र.लो.,लोखाली, मोरगाव, एकुलती खु, रोटवद, मोहाडी, वडगाव, वाघेरी,पळासखेडे प्र.न., सारगाव, शंकरपूर, देऊळगांव,नांद्रा प्र.लो., पारोळा तालुक्यात मंगरूळ, खेडीढोक, सांगवी, मोंढाळे, मोहाडी, दहिगाव, पोपटनगर,रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री, हिवरखेडा,वडगाव, अमळनेर तालुक्यात भोरटेक, जैतपीर, निसर्डी, ढेकू खु, डांगर बु., धानोरा, शिरसाळे बु., देवगाव देवळी, तळवाडे, पिंपळे बु., अटाळे, सुंदरपट्टी, सारबेटे, आर्डी आनोरे, मालपूर कचरे, गडखांब, दरेगाव, वाघोदे, नगाव खु., गलवाडे खु., गलवाडे बु., पिंपळे ख.ु, पिंपळी प्र.ज, वासरे, खेडी,प्र.ज, खेडी बु, बोरगाव, इंदापिंप्री, कावपिंप्री,भरवस, लोणपंचम आदी गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.