जळगाव जिल्ह्यात सरकारी गोदामात धान्यात अफरातफर प्रकरणात तीन गोदामपालांचा निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 09:41 PM2018-02-12T21:41:04+5:302018-02-12T21:42:23+5:30
सरकारी गोदामात धान्यांची अफरातफर व अनियमितता प्रकरणात बी.आर.जगताप (भुसावळ), एस.बी.तिवारी (मुक्ताईनगर) व आर.एच.कु-हेकर (चाळीसगाव) या तीन गोदामपालांचा निलंबनाचा प्रस्ताव असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात आदेश पारित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वृत्तास जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दुजोरा दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ :सरकारी गोदामात धान्यांची अफरातफर व अनियमितता प्रकरणात बी.आर.जगताप (भुसावळ), एस.बी.तिवारी (मुक्ताईनगर) व आर.एच.कु-हेकर (चाळीसगाव) या तीन गोदामपालांचा निलंबनाचा प्रस्ताव असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात आदेश पारित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वृत्तास जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सरकारी गोदामातील धान्याची अफरातफर होत असल्याच्या तक्रारीवरुन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथील शासकीय गोदामाची पाहणी केली होती. त्यात आढळलेल्या त्रुटीवरुन खडसे यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई येथील पथकाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सरकारी धान्य गोदामांची तपासणी केली होती.
गहू, तांदूळमध्ये तफावत
मुंबईच्या पथकाने केलेल्या तपासणीत भुसावळ येथे १५८ पोते गहू जास्त तर ९१ पोते तांदूळ कमी आढळला होता.चाळीसगाव येथे २२ पोते गहू कमी तर ३९ पोते तांदूळ जास्त आढळून आला होता. मुक्ताईनगरात अनियमितता आढळून आली होती. या पाहणीचा अहवाल पथकाने जिल्हाधिकाºयांकडे दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भुसावळ, चाळीसगाव व मुक्ताईनगर येथील गोदामपाल यांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.