पाच हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:55+5:302021-04-10T04:16:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भुसावळ न्यायालयातील सरकारी वकिल राजेश गवई ...

Prosecutor arrested for accepting Rs 5,000 bribe | पाच हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अटकेत

पाच हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भुसावळ न्यायालयातील सरकारी वकिल राजेश गवई यांना पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना जळगावात रंगेहाथ पकडले. या कारवाईबाबत जळगाव व नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधला असता त्यांनी कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भुसावळातील एका प्रकरणात अटक असलेल्या आरोपीच्या जामीनाला विरोध करण्यासाठी सरकारी वकिलाने तक्रारदाराकडून पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेवून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलीस निरिक्षक उज्ज्वल पाटील व प्रशांत सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश महाजन यांनी जळगावातील पाटबंधारे कार्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सापळा रचला. अखेर भुसावळ न्यायालयातील सरकारी वकील राजेश गवई यांनी पाच हजार रूपयांची लाच घेताच, त्यांना नाशिकच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

कोट

भुसावळ न्यायालयातील सरकारी वकील राजेश गवई यांना लाच घेताना अटक केली आहे. कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल.

उज्ज्वल पाटील, पोलीस निरीक्षक, एसीबी, नाशिक.

Web Title: Prosecutor arrested for accepting Rs 5,000 bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.