भावाच्या घराचे संरक्षण पण स्वत:कडे घरफोडी

By Admin | Published: January 22, 2017 12:31 AM2017-01-22T00:31:08+5:302017-01-22T00:31:08+5:30

जळगाव: भावाच्या घराची राखणदारी करण्यासाठी गेले असताना दुसरीकडे स्वत:च्याच घरात घरफोडी झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे शंकरराव नगरात उघडकीस आला.

Protecting your brother's house but screaming to yourself | भावाच्या घराचे संरक्षण पण स्वत:कडे घरफोडी

भावाच्या घराचे संरक्षण पण स्वत:कडे घरफोडी

googlenewsNext

जळगाव: भावाच्या घराची राखणदारी करण्यासाठी गेले असताना दुसरीकडे स्वत:च्याच घरात घरफोडी झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटे शंकरराव नगरात उघडकीस आला. तर याच परिसरात असलेल्या गिताई नगरात रात्रपाळीच्या डय़ुटीला गेलेल्या डॉक्टरकडेही चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. या दोन्ही घरफोडीमध्ये 1 लाख 19 हजाराचा ऐवज लांबविण्यात आला आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरराव नगरात राहणारे ललित वसंत काळे (वय 43) यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. योगेश्वर नगरात राहणारे मोठे भाऊ वसंत काळे व वहिणी सरला हे 18 जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले असल्याने तेथे त्यांची मोठी मुलगी गायत्री व आई जनाबाई या दोघीच होत्या. त्यामुळे काळे यांची प}ी संध्या, मुलगा गणेश व गोविंदा हे भावाकडे राहायला गेले. तर 20 जानेवारी रोजी ललित हे देखील रात्री साडे आठ वाजता घर बंद करुन भावाच्या घरी गेले.
 या दोन दिवसात प}ी घरी-येजा करीत होती. शनिवारी सकाळी सहा वाजता ललित हे घरी गेले असता कंपाऊडचे कुलूप जैसे थे होते, परंतु मुख्य लोखंडी दरवाजाची कडी तोडलेली होती तर घरात सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता व कपाट उघडे होते त्यातील तिजोरीही तोडलेली होती.
लगAातील ऐवज लांबविला
लगAात भेट म्हणून आलेली 50 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी व 40 हजार रुपयांची रोकड तसेच देव्हा:यात ठेवलेले  चांदीचे शिक्के व प}ीच्या पाकीटातील किरकोळ रक्कम चोरटय़ांनी लंपास केली आहे. चोरटय़ांनी स्वयंपाक घरातील रॅकवरील डबेही उघडे करुन ठेवले होते. तसेच घरातील सामानही सर्वत्र फेकण्यात आलेले दिसत होते.

Web Title: Protecting your brother's house but screaming to yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.