महावितरण अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:28+5:302021-03-29T04:11:28+5:30
जळगाव : महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ व दोरीने ...
जळगाव : महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ व दोरीने बांधून गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ अल्पसंख्याक समाजातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
यावेळी अल्पसंख्यांक अधिकारी- कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा जीएसटीचे माजी उपायुक्त एन.ए. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष सलीम इनामदार, हुसेनी सेनाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, सालारनगरचे सैयद दानिश, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, शरीफ शाह बापू फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ शाह, तांबापूर संघटनेचे नदीम शेख नबी व एजाज अहेमद शेख, मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख उपस्थित होते. निवेदनावर अक्सा बॉईज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.आमीर शेख, शिवसेनेचे महानगराध्यक्ष झाकीर पठाण, एमपीजेचे अध्यक्ष आरिफ देशमुख, मार्क्सवादी पक्षाचे अकिल पठाण व अपनी गल्लीचे अध्यक्ष अताअल्लाह खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.