वृत्तपत्र विक्रेत्यांना मारहाणीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:56+5:302021-05-22T04:15:56+5:30

जळगाव : वृत्तपत्र विक्रेते विशाल वाणी व सुनिल पाटील यांना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मारहाण केली तसेच त्यांच्याकडून २०० ...

Protest against beating of newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांना मारहाणीचा निषेध

वृत्तपत्र विक्रेत्यांना मारहाणीचा निषेध

Next

जळगाव : वृत्तपत्र विक्रेते विशाल वाणी व सुनिल पाटील यांना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मारहाण केली तसेच त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड देखील वसुल केला. या घटनेचा जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाने निषेध केला आहे.

संत गाडगेबाबा चौक, महाबळ परिसर येथे वृत्तपत्र विक्रेते विशाल वाणी यांचा न्युज पेपर स्टॉल आहे. तेथे ते व सुनिल पाटील हे वृत्तपत्र वितरणासाठी आपल्या पिशवीत वृत्तपत्रे भरत असतांना सकाळी पोलीस व मनपाचे कर्मचारी तेथे आले तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील आले. त्यांनी सुचना न देताच वाणी यांच्या दुचाकीवर काठ्या मारल्या. तसेच वाणी यांनादेखील मारहाण केली. या घटनेचा जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी, उपाध्यक्ष नितीन चौधरी, सचिव विजय केतकर, रविंद्र जोशी, गोपाळ जोशी, हेमंत खडके, तुषार चौधरी, महेश सोनार, प्रमोद चौधरी, मिलिंद भावसार यांनी निषेध केला आहे.

Web Title: Protest against beating of newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.