कर्नाटकमधील भाजप सरकारचा विविध संघटनांतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:27 PM2020-08-10T12:27:38+5:302020-08-10T12:27:48+5:30
शिवरायांचा पुतळा काढला : एनएसयुआय, शिवसेना आक्रमक
जळगाव : कर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्थापित पुतळ्याला परवानगी असतानादेखील रात्रीच्या काळोखात तो अचानक हटवल्याबद्दल कर्नाटकच्या भाजप सरकारचा एनएसयुआयतर्फे तसेच शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.
याप्रसंगी एनएसयूआय जल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीप पटेल, शहर सचिव योगेश देशमुख, जमील शेख, जगदीश गाडे, सेवादल महानगराध्यक्ष कैलास महाजन, दादाराव मराठे, सोनू पाटील, उद्धव वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.