चुलीवर भाकरी थापून गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:28+5:302020-12-29T04:14:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एल.पी.जी.गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे चुलीवर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले. यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एल.पी.जी.गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे चुलीवर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले. यावेळी सिलिंडरला हार घालून श्रद्धांजली वाहून थाळीनादही करण्यात आला. आकाशवाणी चौकात दुपारी तीन वाजता हे आंदोलन करण्यात आले.
डिसेंबर महिन्यात दोन वेळा गॅस दरवाढ झाली. पेट्रोल, डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ करून सामान्यांची लूट होत असल्याचा आरोप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. यावेळी उपाध्यक्षा मिनाक्षी चव्हाण, प्रदेश सचिव वंदना चौधरी, सरचिटणीस ममता तडवी, सरचिटणीस कमल पाटील, रईसाबी पटेल, डॉ. सुषमा चौधरी, सरिता माळी, सचिव शोभा चौधरी, कोमल महाजन, सरला पाटील, मनिषा गव्हारे, गंगुबाई शेळके, राणी सविता जान, रेश्मा जान, मेहंदी जान, अर्चना जान व कल्याणी जान आदी उपस्थित होते.