नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा धरणगाव येथे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:47+5:302021-08-25T04:20:47+5:30
धरणगाव येथे शिवसेना युवासेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाशिक येथे एकेरी भाषा ...
धरणगाव येथे शिवसेना युवासेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाशिक येथे एकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध करण्यासाठी धरणगाव शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत घोषणा देऊन निषेध केला. मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्यावर भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५(२), १५३ ब (१)क खाली लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख यांनी निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी त्यांनी राणे पितापुत्रांचा खरपूस समाचार घेतला. तसेच राणेंची पुढच्या हप्त्यात जळगावला सभा असून, ती सभा उधळून लावण्याचे आदेशसुद्धा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले. नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी, कोंबडी चोर याला मुख्यमंत्री पदाची काय गणिमा असते हेच माहीत नसेल तर भाजपने नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घ्यावा, असे मत व्यक्त केले तसेच या निषेध मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिला. काँग्रेसचे चंदन पाटील यांनीही तीव्र शब्दांत निषेध केला. या वेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, उपजिल्हा संघटक ॲड. शरद माळी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भगवंत चौधरी महाजन, सुरेश महाजन, जितू धनगर, अहेमद पठाण, माजी नगरसेवक आत्माराम माळी, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, डी. ओ. पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, तालुका प्रमुख चेतन पाटील, संघटक धीरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, सतीश बोरसे, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, राहुल रोकडे सोनवणे, सद्दाम अली छोटू चौधरी, वाल्मिक पाटील, भीमराव धनगर, करण वाघरे, गोपाल पाटील, नानु महाजन, आण्णा महाजन, बाळू जाधव, नंदलाल महाजन, योगेश पाटील, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
240821\20210824_121954.jpg
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना निवेदन सादर करताना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ शहर प्रमुख राजेंद्र महाजन नगराध्यक्ष निलेश चौधरी