फैजपूर प्रांतांशी फळ विक्रेत्यांनी घातलेल्या वादाचा सर्वच स्तरातून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:48 PM2020-05-08T14:48:29+5:302020-05-08T14:49:59+5:30
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याशी फळविक्रेत्यांनी वाद घालत वाहन चालकाला धक्काबुक्की केल्याबद्दल तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांचे वाहन चालक उमेश तळेकर यांच्याशी रावेर येथील फळविक्रेत्यांनी वाद घालत वाहन चालकाला धक्काबुक्की केल्याबद्दल यावल -रावेर तालुका तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे अशा आशयाचे निवेदन फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना देण्यात आले, तर फैजपूर भाजपतर्फे प्रांतांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे तसेच सर्वच स्तरातून प्रांतांशी झालेल्या वादाचा निषेध व्यक्त होत आहे.
गुरुवारी फैजपूर प्रांताधिकारी थोरबोले हे रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रावेर येथिल आंबेडकर चौक परिसरात फळ विक्रेत्यांच्या समोर गर्दी दिसून आल्याने त्यांनी फळ विक्रेत्यांना कोरोना विषाणूचा संदर्भ देत मास्कचा वापर करण्जाबाबत व सोशल डिस्टन्स्टिंगबाबत सूचना दिल्या. मात्र फळ विक्रेत्यांनी चुकीचा अर्थ घेवून प्रांताधिकारी व त्यांच्या वाहन चालकाशी वाद घातला. शिवाय वाहन चालकाला धक्काबुक्की केली. या घटनेचा सर्च स्थरातून तीव्र निषेध होत असतांना शुक्रवारी यावल रावेर तालुका तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटना यांनीही निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, अव्वल कारकून आर.आय.तडवी, फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी.बंगाळे उपस्थित होते. यावल-रावेर तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.
दरम्यान, महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.
प्रांतांना संरक्षण द्या-भाजपची मागणी
प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा फैजपूर शहर भाजपने निषेध व्यक्त करून प्रांताधिकाऱ्यांना संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाला दिलेले आहे. निवेदन देताना भाजप शहर अध्यक्ष अनंता नेहेते, दीपक होले, संजय सराफ उपस्थित होते