महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर, बैलगाडीसह निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:47+5:302021-07-08T04:12:47+5:30

देशभरात वाढलेली महागाई, उच्चांकी इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य माणसांत प्रचंड असंतोष आहे. महिला विशेषतः गृहिणींचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यांच्यात ...

Protest march with bullock carts on NCP roads against inflation | महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर, बैलगाडीसह निषेध मोर्चा

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर, बैलगाडीसह निषेध मोर्चा

Next

देशभरात वाढलेली महागाई, उच्चांकी इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य माणसांत प्रचंड असंतोष आहे. महिला विशेषतः गृहिणींचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यांच्यात केंद्र सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी तसेच इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. तरी केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी मोर्चात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. उद्धव पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, रामदास पाटील, सईद बागवान, दीपक झांबड, सागर जैस्वाल, विजय पालवे, सुभाष पाटील, दीपक वाणी, सुरेंद्र पाटील, दिनेश माळी, महिला तालुकाध्यक्ष वंदना पाटील, डॉ. काजळे, डॉ. आतिष चौधरी, वामनराव ताठे, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, रवींद्र खेवलकर, विनोद कोळी, प्रमोद धामोडे, सम्राट पाटील, गोपाळ गंगातिरे, कल्पेश शर्मा, सतीश पाटील, कडू माळी, समाधान बोदडे, दिलीप पोळ, अक्षय चौधरी, भगतसिंग पाटील, विजय पाटील, श्रवण बोदडे, संदीप घडेकर, सुमेर राजपूत, बंटी गुरचळ, कृष्ण पाटील, प्रकाश पाटील, हर्ष कोटेचा, गणेश चौधरी, जीवन राणे, गणेश पाटील, श्याम सोनवणे, अनंता पाटील, आकाश फाटे, किरण वंजारी, मधुकर पाटील, नीलेश पाटील, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कालू मेम्बर, शेख सलाम, हकीम बागवान, रितिक पाटील, सुमेर गुरचळ, ईजहार शेख, नितीन चव्हाण, शेख अजिज, जावेद बागवान व सर्व सेलचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Protest march with bullock carts on NCP roads against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.