निधी उपलब्धतेनुसार 100 टक्के कर्ज देणार, खासदार राजू शेट्टी यांच्या ‘ठिय्या’ नंतर आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:34 PM2018-05-03T13:34:52+5:302018-05-03T19:37:11+5:30
शेतकरी सन्मान अभियान
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 3 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘शेतकरी सन्मान अभियान’अंतर्गत खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतक:यांनी जिल्हा बँकेत जाऊन 50 टक्के कर्ज देण्याच्या धोरणाविरोधात ठिय्या आंदोलन केले. अखेर बँकेच्या कर्ज विभागाच्या सरव्यवस्थापक एम.टी. चौधरी यांनी निधी उपलब्धतेनुसार संचालक मंडळाच्या संमतीने 100 टक्के कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘शेतकरी सन्मान अभियान’ अंतर्गत खासदार राजू शेट्टी यांचे दुपारी 12.30च्या सुमारास जिल्हा बँकेत आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी सुकाणू समितीचे एस.बी. पाटील, शेतकरी सन्मान अभियानाचे समन्वयक गजानन पाटील जालना व पदाधिकारी, कार्यकर्ते होते.
बँकेने अपमान योजना सुरू केली
यावेळी अधिका:यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून 100 टक्के कर्ज दिले तर बँक अडचणीत येऊन कर्मचा:यांचे पगार अदा करणे देखील मुश्कील होईल, असे सांगितले. त्यावर खा.राजू शेट्टी यांनी कजर्वसुलीसाठी आवाहन करा, शेतकरी तुम्हाला सहकार्य करतील, मात्र 50 टक्केच कर्ज देणार हा शेतक:याचा अपमान आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काढलेली असताना त्याचा लाभ मिळालेल्या शेतक:यासाठी मात्र बँकेने ही अपमान योजना सुरू केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सुमारे 1 लाख शेतक:यांचा हा विषय असून त्यांना बँकेने 50 टक्केच कर्ज देण्याची भाषा केली तर त्या शेतक:यांची बाजारात पत घसरते. कजर्माफीमुळे जिल्हा बँकेला 600 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यामुळे बँकेने शेतक:यांना पूर्ण कर्ज द्यावे. लगेच सर्व 1 लाख शेतक:यांना कर्ज द्यावे, अशी मागणी नाही. तर जसजसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार पूर्ण कर्ज देण्याची मागणी करण्यात आली.
प्रक्रिया उद्योग, कारखान्यांचे कर्ज वसुल करा
खासदार शेट्टी म्हणाले की, जिल्हा बँकेने सहकारी, खाजगी साखर कारखान्यांना, सुतगिरणी, केळी प्रक्रिया उद्योगांना कर्ज दिले आहे. त्याची सक्तीची वसुली करावी. त्यासाठी शेतकरी मदत करेल. त्यावर बँकेच्या अधिका:यांनी जिल्हा बँकेने यापूर्वीच कजर्वसुलीसाठी काही साखर कारखान्यांची विक्री केली आहे. तसेच वसाकाची विक्री प्रक्रिया सुरू आहे. जे.टी. महाजन सूतगिरणी विक्रीसाठी 5 वेळा निविदा काढण्यात आली. आता जागा व मशिनरी विक्रीची प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाणार असल्याचे सांगितले.
बँकेच्या अडचणीबाबत खासदार शेट्टी करणार पाठपुरावा
यावेळी बँकेच्या अधिका:यांनी बँकेची 1300 कोटींची थकबाकी आहे. नाबार्ड 5 टक्के दराने राज्य सहकारी बँकेमार्फत निधी देते. मात्र राज्य बँक जिल्हा बँकेला पैसे देण्यासाठी तेवढीच ठेव ठेवण्याची सक्ती करते. त्यामुळे जिल्हा बँकेला राज्यबँकेकडून 9.5 टक्कय़ांनी निधी मिळतो. तर जिल्हा बँकेला मात्र 6 टक्केच व्याज राज्य बँक देते. ही अडचण ऐकल्यावर खासदार शेट्टीही आश्चर्यचकित झाले. याबाबत पत्र द्या.
मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करून पाठपुरावा करतो, तसेच नाबार्डच्या चेअरमनला विनंती करतो. असे सांगितले.
तर राज्य बँकेने स्वतंत्र व्हावे
खासदार शेट्टी म्हणाले की, जर राज्य सहकारी बँक जिल्हा बँकांच्या कामात अडथळे आणत असेल तर राज्य बँकेने वेगळे व्हावे. जिल्हा बँकांशी संबंध तोडून टाकावे. नाबार्डने थेट जिल्हा बँकेला पतपुरवठा करावा.
लेखी आश्वासनानंतर परतले आंदोलक
खासदार राजू शेट्टी व कार्यकत्र्यानी जिल्हा बँकेने एकदम कर्ज द्यावे, अशी मागणी नाही. मात्र जसजसा निधी उपलब्ध होईल, तसतसे संचालक मंडळाच्या मंजुरीने 100 टक्के कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. बराच वेळ चर्चा झाल्यावर अखेर स्वाभिमानीतर्फे मागणीचे निवेदन द्यावे व त्यावर बँकेकडून आरबीआय व नाबार्डच्या नियमांनुसार व जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार कर्ज देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलक जिल्हा बँकेतून शासकीय विश्रामगृहावर परतले.
कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार
यावेळी जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.