विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निषेधार्थ जळगावात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:09 PM2019-08-08T13:09:56+5:302019-08-08T13:10:11+5:30
आंदोलन
जळगाव : महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निषेधार्थ जळगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने नूतन मराठा महाविद्यालया समोर निषेध व्यक्त करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात महाविद्यालय निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. १शिक्षणमंत्री सहाब एक काम करो - खुर्ची छोडो आराम करो’, महाराष्ट्र शासनाचे करायचे काय - खाली डोके वरती पाय अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. या वेळी अभाविप प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री रितेश चौधरी, प्रदेश राष्ट्रीय कलामंच संयोजक प्रसाद जाधव, विराज भामरे, सोहम पाटील, शिवम नाईक, किरण जैन, वैष्णवी सोनवणे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.