जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:41+5:302021-05-30T04:14:41+5:30

जळगाव : तिन्ही कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, शेतकऱ्यांना योग्य भावात खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत, तातडीने पीक ...

Protest selling vegetables in front of the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करीत निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करीत निषेध

Next

जळगाव : तिन्ही कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, शेतकऱ्यांना योग्य भावात खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत, तातडीने पीक कर्ज वाटप करावे, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी यांसह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करीत आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकरी वर्गाला देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अडचणी आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने शनिवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. याच अनुषंगाने जळगावातदेखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भाजीपाला विक्री करीत निषेध

आंदोलनप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करीत निषेध नोंदवला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आहेत मागण्या

- खते, बियाणे जुन्या दरापेक्षाही ५० टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत.

- नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तूंची दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.

- तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना आदेश द्यावेत.

- बोगस बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री थांबवावी, कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी

- केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्यात यावेत.

Web Title: Protest selling vegetables in front of the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.