पगार कपातीच्या मागणीचा शिक्षक आघाडीतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:00+5:302021-04-26T04:14:00+5:30

जळगाव : राज्यातील महाविद्यालय, माध्‍यमिक व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचे ७५ टक्के पगार कापण्याची मागणी सोलापूरच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ...

Protest by teachers' front demanding salary cut | पगार कपातीच्या मागणीचा शिक्षक आघाडीतर्फे निषेध

पगार कपातीच्या मागणीचा शिक्षक आघाडीतर्फे निषेध

Next

जळगाव : राज्यातील महाविद्यालय, माध्‍यमिक व प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांचे ७५ टक्के पगार कापण्याची मागणी सोलापूरच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचा भाजपा शिक्षक आघाडीच्यातर्फे निषेध व्यक्त करण्‍यात आला आहे.

कोरोनाच्या महामारीत ऑनलाईन शिक्षणासह शिक्षक कोरोना वाॅर्डात जावून रूग्णांची देखभाल करीत आहेत. तेही कुठलेही मेडिकल, पॅरामेडिकलचे शिक्षण नसताना, त्याचबरोबर रेशनवर धान्य वाटप तर कधी घरोघर जाऊन काही ठिकाणी पोलिसांसोबत नाक्यांवर शिक्षकांनी तपासण्या केल्या. कुठल्याही विमा संरक्षणाशिवाय कोरोना महामारीत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण, शाळा बाह्य मुलांचा शोध, बी.एल.ओ. निवडणुका, मग गुरे मोजण्यापासून तर स्वच्छता गृहांची मोजणी करण्यापर्यंतची कामे शिक्षक करीत असतात. नुकतेच धरणगाव तालुका शिक्षकांनी एकत्रित येवून लाखो रुपयांचा निधी जमवून ऑक्सिजनची व्यवस्था केली. तरी देखील काँग्रेसकडून पगार कपातीची मागणी केली जाते. या मागणीचा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रवीण जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

Web Title: Protest by teachers' front demanding salary cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.