भडगावला एन.मुक्टो.चे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:41 PM2020-01-10T15:41:54+5:302020-01-10T15:42:07+5:30
जनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापकांच्या एन.मुक्टो. संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाला पाठिंबा दिला.
भडगाव, जि.जळगाव : रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापकांच्या एन.मुक्टो. संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाला पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
जुनी पेंशन योजना लागू करण्यात होत असलेली दिरंगाई, किमान वेतन कायद्याची न झालेली अंमलबजावणी, अर्धवेळ व ठोक वेतन पध्दती, कामगारविरोधी धोरणे अशा विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केली होती.
या आंदोलनात स्थानिक एन.मुक्टो. शाखेचे केंद्रीय प्रतिनिधी प्रा. ए.एन.भंगाळे, जिल्हा प्रतिनिधी प्रा. व्ही. टी.बागूल, शाखा अध्यक्ष डॉ.दिनेश तांदळे, उपाध्यक्ष डॉ.अतुल देशमुख, सचिव प्रा.शिवाजी पाटील, सदस्य प्रा. एम.डी.बिर्ला, प्रा. एल.जी. कांबळे, डॉ. डी.एम.मराठे, डॉ.एन.व्ही. चिमणकर, प्रा.एस.जी.शेलार, प्रा. एस.एम.झाल्टे हे सहभागी झाले होते.