कृषी कायद्याविरोधात पेट्रोल पंपासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:03+5:302020-12-11T04:42:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव: कृषी कायद्याला विरोध तसेच केंद्र सरकार अदानी व अंबानी या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: कृषी कायद्याला विरोध तसेच केंद्र सरकार अदानी व अंबानी या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आंदोलन केले. यात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ८ ते १० लोकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविला.
गुरुवारी सकाळी ११.१५ ते दुपारी १ पर्यंत हे आंदोलन झाले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, छावा मराठा युवा महासंघ अध्यक्ष अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे, महाराष्ट्र जनक्रांतीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, मणियार बिरादरचे अध्यक्ष फारुक, नियाज अली फाउंडेशनचे अय्याज अली, सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, बुलंद छावा अध्यक्ष प्रमोद पाटील, कादरिया फाउंडेशनचे फारुक कादरी, एमआयएमचे जिया बागवान, सिद्धार्थ शिरसाठ, योगेश गजरे, कलंदर तडवी, दामू भारंबे, फाईम पटेल, अभिषेक कदम, मनोज अहिरे, अलुशे खाटीक, प्रकाश पवार, जहागीर शेख, राहुल जाधव, रितीक गुरुचल, लकी पवार, पंकज सपकाळे, संदीप निकम, अजय इंगळे, मुक्तार अली आदी उपस्थित होते.