महावितरणच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:01+5:302021-05-18T04:18:01+5:30
कामगार संघटना : फ्रंट लाईन वर्कर घोषीत करण्याची मागणी जळगाव : गेल्या वर्षी मार्च पासून महावितरणच्या तिन्ही ...
कामगार संघटना : फ्रंट लाईन वर्कर घोषीत करण्याची मागणी
जळगाव : गेल्या वर्षी मार्च पासून महावितरणच्या तिन्ही कंपन्यातील कर्मचारी कोरोना काळातही काम करत असून, अनेक कर्मचारी बधित तर काही मृत्युमुखी पडलेल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर घोषीत करून, त्यांना सर्व सोयीं सुविधा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी महावितरणच्या विविध कामगार संघटनांनी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले.
महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील ८६ हजार कामगार,अभियंते व अधिकारी तसेच ३२ हजार कंत्राटी,आऊट-सोर्सिंग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जाहिर करण्याचा प्रस्ताव तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी ऊर्जा विभागास एक महिन्यापूर्वी पाठविला आहे. तर ऊर्जा विभागाने आरोग्य विभागास पाठविला आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्याप या विषयावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे महावितरणच्या संघटनांतर्फे ही निदर्शने करण्यात आली. यावेळी संध्या पाटील, दिनेश बडगुजर, प्रभाकर महाजन, किशोर जगताप, जे. एन. बाविस्कर, पी.वाय. पाटील, नाना पाटील, प्रकाश कोळी देविदास सपकाळे, अविनाश तायडे , सागर कांबळे, विरेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.