लक्ष अंतर्गत गुणात्मक व दर्जात्मक रुग्णसेवा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:39+5:302021-06-28T04:13:39+5:30
पहूर, ता. जामनेर : ‘लक्ष’अंतर्गत दर्जात्मक व गुणात्मक रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज रहा जेणेकरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळता येईल, ...
पहूर, ता. जामनेर : ‘लक्ष’अंतर्गत दर्जात्मक व गुणात्मक रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज रहा जेणेकरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळता येईल, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या आढावा बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पहूर ग्रामीण रुग्णालयात नाॅनकोविड आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी रुग्णालयात बैठक घेऊन आढावा घेतला आहे. लक्ष अंतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्याकरिता लक्ष अंतर्गत गुणात्मक व दर्जात्मक आरोग्य सुविधेची प्रसूतीशास्त्र दरम्यान काळजी घ्यावी लागणार आहे.
याबरोबरच नाॅन कोविड सुविधेअंतर्गत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसूतीशास्त्र व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सांगितले आहे. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगितले असून कोरोना कालखंडात कंत्राटी पध्दतीने आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुढील सेवा पूर्ववत ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत, डॉ. कीर्ती पाटील, डॉ. शेख मोहम्मद आरीफ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
270621\27jal_8_27062021_12.jpg
===Caption===
पहूर रुग्णालयात नाँनकोविड सुविधा सुरू करण्यासाठी आढावा बैठकीत वैद्यकीय अधिकार्यांना सुचना देतांना डॉ. नागोजीराव चव्हाण.