अपार्टमेंटमध्येही स्वतंत्र नळकनेक्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:35+5:302021-01-13T04:37:35+5:30

शिवकॉलनीवासियांनी घेतली महापौरांची भेट : जुने बांधकाम असलेल्या अपार्टमेंटमध्ये सम करणे कठीण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाने ...

Provide separate plumbing in the apartment as well | अपार्टमेंटमध्येही स्वतंत्र नळकनेक्शन द्या

अपार्टमेंटमध्येही स्वतंत्र नळकनेक्शन द्या

Next

शिवकॉलनीवासियांनी घेतली महापौरांची भेट : जुने बांधकाम असलेल्या अपार्टमेंटमध्ये सम करणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा प्रशासनाने शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत एका अपार्टमेंटमध्ये एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरात अनेक भागात जुने अपार्टमेंट आहेत. याठिकाणी पाण्याची टाकी किंवा समदेखील तयार करणे कठीण आहे. त्यामुळे अशा अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी शहरातील शिवकॉलनी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी नागरिकांनी मंगळवारी महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली.

तसेच आपल्या मागणीबाबत मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा. सचिन पाटील, प्रतिभा देशमुख, गजानन देशमुख, शहर अभियंता अरविंद भोसले, सुशील साळुंखे, योगेश बोरोले आदी उपस्थित होते. निवेदन सादर केलेल्या शिवकॉलनी भागातील रहिवाशांच्या अपार्टमेंटचे बांधकाम १९८५ सालचे आहे. त्याठिकाणी अमृत योजनेसाठी पाण्याची टाकी बांधण्याची व्यवस्था नाही. तसेच सम बांधणेही कठीण आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने ठराविक अपार्टमेंटधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. यावेळी आयुक्तांनी पाहणी करून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेणार

महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना याबाबतीत प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच जर सम किंवा टाकी तयार करता येत नसेल तर अशा ठिकाणी स्वतंत्र नळ कनेक्शन देणे, तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरेल का? याबाबतही तपासणी करण्याची सूचना महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना दिली आहे.

Web Title: Provide separate plumbing in the apartment as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.