यावलमधील आयशानगरात मूलभूत सुविधा मिळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 02:44 PM2019-01-27T14:44:40+5:302019-01-27T14:47:09+5:30

यावल येथील आयशा नगरात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी येथील प्रभारी मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांना निवेदन देवून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Providing basic amenities in the Ishanah city of Yaval | यावलमधील आयशानगरात मूलभूत सुविधा मिळाव्यात

यावलमधील आयशानगरात मूलभूत सुविधा मिळाव्यात

Next
ठळक मुद्देरहिवाशांचे पालिकेला  साकडेमुख्याधिकाऱ्यांची घेतली भेटपालिकेस स्थायी मुख्याधिकारी नाही

यावल, जि.जळगाव : येथील आयशा नगरात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी येथील प्रभारी मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांना निवेदन देवून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
शहरालगत असलेल्या आयशा नगरात गेल्या १५ वर्षांपासून वस्ती झालेली आहे. वस्तीत गटारी, खुल्या जागेस संरक्षण भिंती तसेच नाल्यावरील पुलास कठडे करून देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी केली मागणी आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रहिवासी वारंवार पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.
वस्तीत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पालिकेने पाईपलाईन केलेली नसल्याने पालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. रस्त्याचे डांबरीकरण नाही. अनेक भागात रस्त्यावर दिवे नसल्याने व हा भाग जंगलाचा असल्याने रात्री-बेरात्री रहिवाशांना जीव धोक्यात टाकावा लागतो. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. निवेदनावर अशफाक शहा गफफारशहा, शे.जावेद शे.याकुब, जुबेर खान रउफ खान, इमरान लुकमान पटेल, वसीम सिकंदर पटेल, शे.वसीम यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
पालिकेस मुख्याधिकारी नाहीत
गेल्या दोन वर्षापासून येथील पालिकेचा पदभार रावेर मुख्याधिकारी यांच्याकडे आहे आणि ते मुख्याधिकारी केवळ दोन दिवस यावल पालिकेत येतात. परिणामी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. यातून शहराचा विकास ठप्प झाला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथील नगरपालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणीही होत आहे.

Web Title: Providing basic amenities in the Ishanah city of Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.