रावेर येथे शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत पहिला धनादेश प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:57 PM2019-06-05T14:57:07+5:302019-06-05T14:58:26+5:30
शासकीय वखार महामंडळाच्या गोदामात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत पहिला धनादेश शेतकरी डॉ.सुभाष पाटील यांना प्रदान करण्यात आला.
रावेर, जि.जळगाव : शासकीय वखार महामंडळाच्या गोदामात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत पहिला धनादेश शेतकरी तथा कृउबाचे माजी सभापती डॉ.सुभाष पाटील यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला.
बाजार समितीच्या शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत शासकीय वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माजी सभापती डॉ.सुभाष पाटील यांच्या शेतातील हळदीच्या उत्पादन तारण ठेवून शेतमाल तारण कर्ज योजनेचा शुभारंभ आजपासून करण्यात आला.
आजच्या बाजारभावानुसार ६ लाख २१ हजार रू. किमतीच्या हळदीवर दर साल दर शेकडा सहा टक्के दराने ३ लाख ७२ हजार ६०० रू.चे शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत पहिला धनादेश सभापती डी.सी. पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संचालक योगेश पाटील, सचिव गोपाळ महाजन, उपसचिव संतोष तायडे, पर्यवेक्षक कमलाकर पाटील, जयंत पाटील, अरूण महाजन आदी उपस्थित होते.