पहूर कोवीड सेंटरमधील असुविधांवरून प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:48 PM2020-06-02T21:48:07+5:302020-06-02T21:48:44+5:30
सोशलडिस्टन्सचा बोजवारा
पहूर ता जामनेर: पहूर कोवीड सेंटरमधील असुविधा पाहून प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाºयांना फटकारल्याने प्रशासनाचाच हलगर्जीपणा पुढे आला आहे. विशेष म्हणजे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींमध्ये सोशलडिस्टन्सचा बोजवारा उडल्याचे यावेळी निदर्शनास आले.
पहूर कोवीड सेंटरवर प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांनी मंगळवारी पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी अस्वच्छतेचा अभावाबरोबरच सोशलडिस्टन्सिंग न ठेवता एकाच ठिकाणी क्वारंटाईन व्यक्ती असल्याचे आढळले. सेंटरची जागा दररोज सॅनेटराईज न केल्याचे दिसले. सेंटर समोर लाईट व्यवस्थेचा अभाव असून याठिकाणी नियमित परीचारीका नियुक्त नाही.याबाबी प्रांताधिकारी दिपमाला चवरे यांच्या निदर्शनास आल्याने उपस्थित अधिकाºयांचे कान टोचून चांगलेच फटकारले. सुविधांमध्ये तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश अधिकाºयांसह उपस्थित स्थानिक पदाधिकाºयांना चवरे यांनी दिले आहे. यावेळी गटविकास अधिकारी एकनाथ लोखंडे, मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, माजी सभापती बाबुराव घोंगडे, शंकर घोंगडे, तलाठी सुनील राठोड , कोतवाल भानुदास वानखेडे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.