रावेर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात हद्दवाढीतील सुविधांसाठी निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:49 AM2021-03-06T00:49:55+5:302021-03-06T00:49:55+5:30

शहर हद्दवाढीतील योजने अंतर्गत विकास कामांसाठी ७ कोटी ७७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Provision of funds for extension facilities in the budget of Raver Municipality | रावेर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात हद्दवाढीतील सुविधांसाठी निधीची तरतूद

रावेर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात हद्दवाढीतील सुविधांसाठी निधीची तरतूद

Next
वेर : नगरपालिकेचा सन २०२१ - २२ वर्षाकरिता नागरिकांसाठी करवाढ नसलेल्या ३७ कोटी २० लाख ७७ हजार ३३३ रू.चा शिलकी अर्थसंकल्पास शुक्रवारी मंजूर करण्यात आल्याची माहिती न पा मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. शहर हद्दवाढीतील योजने अंतर्गत विकास कामांसाठी ७ कोटी ७७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. काटकसर करून जास्त चांगल्या सेवा पुरविण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यात प्रामुख्याने वैशिष्टयपूर्ण योजनेत नवीन नगरपरिषद प्रशासकिय इमारत बांधण्यासाठी १ कोटी रू, सभागृह बांधण्यासाठी १ कोटी १७ लाख यासह इतर कामांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना न.पा.चे कर हे ऑनलाईन भरणा करण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या सूचना नागरिकापर्यंत पोचविणे कामी मोबाईल संदेश पोहचविण्याकामी खर्चाची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Provision of funds for extension facilities in the budget of Raver Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.