भडगाव तालुक्यातील पथराड येथे मतदानाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 03:21 PM2019-01-06T15:21:46+5:302019-01-06T15:23:06+5:30
कजगाव येथून जवळच असलेल्या पथराड येथे व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या पथराड येथे व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
यापुढील सर्व निवडणुकीत मतदान करताना मतदाराला आपले मतदान कोणाला केले हे समजायला हवे म्हणून अजून एक मशिन मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे. त्यात मतदानावेळी मतदाराने मतदान केल्यावर आपले मतदान योग्य उमेदवाराला मिळाले की नाही हे पाहता येणार आहे. त्यासाठी मतदारांमधे जनजागृती म्हणून निवडणूक आयोगाद्वारे व्हीव्हीपॅट मशिन कसे काम करते हे मतदारांना समजावे म्हणून तालुका स्तरावर तहसीलदारांनी निवडलेले पथक गावोगावी जाऊन लोकाना मतदान प्रक्रिया समजवून देत आहेत. मतदान प्रक्रिया समजल्यावर मतदारांचा अभिप्राय लेखी स्वरूपात घेत आहेत.
५ जानेवारी रोजी पथराड व पथराड तांडा येथे या मतदान जनजागृती पथकाने व्हीव्हीपॅट मशिनद्वारे गावातील मतदारांना मतदानाची नवीन प्रक्रिया उत्तम प्रकारे समजावून दिली. मतदान केंद्र क्रमांक पाच व मतदान केंद्र क्रमांक सहा येथील बीएलओ नंदू दौलत पाटील व सुकदेव माळी यांनी गावांत या पथकाविषयी आधीच जनजागृती केली होती व ज्या दिवशी पथक आपल्या गावांत येईल त्या दिवशी आपण सर्व मतदार बंधू बघीणी मोठ्या संख्येने नवीन मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले.
ठरल्याप्रमाणे पथक आल्यावर मोठ्या संख्येने मतदार उपस्थित राहून सर्वांनी नवीन मतदान प्रक्रिया समजून घेतली. नवीन मतदान प्रक्रिया ही पारदर्शक असल्याचे सर्वच मतदारांनी सांगितले. यात आपले मत योग्य उमेदवाराला मिळाले की नाही हे पाहता येत असल्याने इव्हीएम मशिन घोटाळ्याविषयीची शंका आता मनात राहणार नाही, अशी स्थिती आहे.
पथराड येथे मतदान प्रक्रिया समजावताना पथक.