जनता कर्फ्यू, निर्बंधांच्या पूर्वी होणारी गर्दी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:44+5:302021-03-31T04:16:44+5:30
या शिवाय अनेक आदेशांचे पालन होत नसल्याचे चित्र असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. यंदा ...
या शिवाय अनेक आदेशांचे पालन होत नसल्याचे चित्र असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यंदा काढण्यात आलेले आदेश
२२ फेब्रुवारी - रात्रीची संचारबंदी, आठवडी बाजार, निदर्शने, रॅलीवर बंदी
२२ फेब्रुवारी - बाजार समितीत गर्दी करू नये
२२ फेब्रुवारी - सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास व मास्क न वापरल्यास दंड
५ मार्च - जमावबंदी आदेश
६ मार्च - रात्रीची संचारबंदी, आठवडी बाजार, निदर्शने, रॅलीवरील बंदी १५ मार्चपर्यंत वाढविली
९ मार्च - महापालिका क्षेत्रात १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
११ मार्च - चाळीसगाव व चोपडा येथे निर्बंध
१२ मार्च - गृहविलगीकरणाच्या नियमांचे पालन न झाल्यास होणार गुन्हे दाखल
१४ मार्च - रात्रीची संचारबंदी, आठवडी बाजार, निदर्शने, रॅलीवरील बंदी पुढील आदेशापर्यंत वाढविली
१५ मार्च - जळगाव व जामनेर तालुक्यात द्विस्तरीय समिती
१७ मार्च - रुग्ण दाखल करून घेण्याविषयी मार्गदर्शक सूचना
१८ मार्च - अमळनेर येथे १९ ते २१ मार्च दरम्यान निर्बंध
१९ मार्च - वाॅर रूमवरील नियंत्रणासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्ती
२० मार्च - धरणगाव येथे २३ ते २७ मार्चदरम्यान निर्बंध
२० मार्च - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संपूर्ण कोरोना हॉस्पिटल
२१ मार्च - रुग्णालयामध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
२२ मार्च - वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा ८० टक्के साठा राखीव ठेवा
२२ मार्च - गंभीर रुग्णांना बेड मिळण्यासाठी रुग्णांचे नियोजन करा
२२ मार्च - जिल्ह्यात जमावबंदी
२२ मार्च - एरंडोल लॉकडाऊन
२२ मार्च - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे साहित्य कोरोना उपाययोजनांसाठी वापरा
२३ मार्च - रुग्णांच्या अडचणी सोडविणे, समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
२३ मार्च - गंभीर रुग्णांना संदर्भित न केल्यास डॉक्टरांवर कारवाई
२३ मार्च - रुग्णशोध मोहीम
२६ मार्च - २८ ते ३० मार्च असे तीन दिवस जिल्ह्यात निर्बंध