जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांची साथ, नागरिकांकडून ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:49 AM2020-07-22T10:49:23+5:302020-07-22T10:49:35+5:30

मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद : रस्त्यांवर मात्र वाहनांची गर्दी; दुसºया दिवशी संमिश्र प्रतिसाद

Public curfew with traders, support from citizens | जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांची साथ, नागरिकांकडून ठेंगा

जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांची साथ, नागरिकांकडून ठेंगा

Next

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा प्रशासनाकडून सोमवारपासून शहरात प्रभागनिहाय जनता कर्फ्यू पाळला जात आहे. जनता कर्फ्यूचा दुसºया दिवशी प्रभाग ४, ५ व ६ मध्ये हा कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र, कर्फ्यू दरम्यान मुख्य बाजारपेठ व इतर कॉलनी भागातील सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी बांधवांनी १०० टक्के या कर्फ्यूला पाठिंबा दिला. मात्र, बाजारपेठेतील एकही दुकान उघडे नसतानाही मुख्य बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फिरणाºया नागरिकांनी जनता कर्फ्यूला ठेंगा दाखविल्याचे चित्र दुसºया दिवसाच्या कर्फ्यूमध्ये दिसून आले.
प्रभागनिहाय जनता कर्फ्यूचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ या तीन प्रभांगामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेचा सर्व परिसर प्रभाग क्रमांक ५ मध्येच येत असल्याने बाजारपेठेतील सर्व मार्केटमधील दुकाने, रस्त्यालगतची दुकाने व विविध अस्थापने देखील या जनता कर्फ्यूदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. मात्र, असे असतानाही मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. जनता कर्र्र्र्फ्यू असला तरी मार्केट उघडे असतील या आशेने नागरिक मुख्य बाजारपेठेतील मार्केट परिसरात येवून पाहणी करत होते. त्यामुळे जनता कर्फ्यू असतानाही बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून आली.

मार्केट परिसर संपूर्ण बंद... महापालिकेने मध्यवर्ती भागात गर्दी होवू नये म्हणून २८ रस्ते सील केले आहेत. त्यातच मंगळवारी या भागातच जनता कर्फ्यू असल्याने सुभाष चौक, सराफ बाजार, दाणा बाजार, फुले मार्केट, गांधी मार्केट, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरातील सर्वच दुकाने बंद ठेवून व्यापारी बांधवांनी १०० टक्के या कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दुपारी नागरिकांच्या वर्दळीत देखील घट झाली होती. दरम्यान, गोलाणी मार्केट परिसरात दुकाने बंद ठेवून मोबाईल विक्री करणाºया सात जणांवर मनपाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. यासह काही भाजीपाला विक्रेत्यांचाही माल जप्त करण्यात

अनेक दुकानांबाहेर दुकानदार गर्दी करून उभे
जनता कर्फ्यू जरी असला तरी प्रशासनाने मार्केट उघडण्यास दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली असल्याने मंगळवारीही प्रशासनाकडून मार्केट उघडण्यास परवानगी दिली असेल या आशेने अनेक व्यापारी व दुकानदार आपआपल्या दुकानांबाहेर उभे होते. तसेच प्रशासनाकडून दुपारी १ पर्यंत दुकाने उघडण्याबाबत काही आदेश येतील अशी अपेक्षा अनेक दुकानदारांना लागली होती. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणतेही आदेश न घेतल्याने दुकानदारांनी काढता पाय घेत घरी परतले.

कॉलनी, गल्ली बोळात मात्र कडक कर्फ्यू
प्रभाग क्रमांक ५ मध्ये बहुतांश भाग बाजारपेठेचा आहे. त्यातच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची कार्यालये देखील याच प्रभागात असल्याने नागरिकांची गर्दी या भागात त्यामुळे बाजारपेठ भागात मार्केट बंद असूनही नागरिकांची गर्दी झाली होती. याव्यतिरीक्त या तिन्ही प्रभागात येणाºया पांडे चौक परिसर, शाहू नगर, प्रताप नगर, गांधी नगर, बळीराम पेठ, आर.आर.विद्यालय परिसर, हौसिंग सोसायटी परिसर, विसनजी नगर, जयकिशनवाडी, राधाकिसनवाडी, तायडे गल्ली याभागात मात्र कर्फ्यू चांगल्या प्रकारे पाळण्यात आला.

दुपारी बाजारातील गर्दी झाली कमी
मुख्य बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र, बाजारपपेठेतील सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिकांचीही गर्दी हळूहळू झाली. दुपारी २ वाजेनंतर मुख्य बाजारपेठ भागात गर्दी, वाहनांची वर्दळ क मी झाली होती. बळीराम पेठ, चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरात दुपारी ३ वाजेनंतर शुकशुकाट पहायला मिळाला.

बुधवारी या भागात होणार जनता कर्फ्यू
प्रभाग क्रमांक ७ - महेश प्रगती परिसर, अजय कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, गणेश कॉलनी, शिव कॉलनी, आर.एम.एस. कॉलनी, रिंगरोड परिसर, कृषी कॉलनी

प्रभाग क्रमांक ८ -
भोईटे नगर, म्हाडा कॉलनी, शांती नगर, प्रज्ञा कॉलनी, हायवेदर्शन कॉलनी, दादावाडी परिसर, खोटेनगर, वैष्णवी पार्क, व्दारका नगर, वाटिकाश्रम.

प्रभाग क्रमांक ९ - मुक्ताईनगर, द्रौपदी नगर, दांडेकरनगर, ओमशांती नगर, पाढंरी प्लॉट परिसर, शिंदे नगर, मानव शाळा परिसर

Web Title: Public curfew with traders, support from citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.