लोककल्याणकारी माता अहल्याबाई होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:09+5:302021-05-28T04:13:09+5:30

एन्ट्रो- पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचा ३१ मे रोजी जन्मदिन. यानिमित्ताने युद्ध नको ...शांती हवी म्हणणारे संवेदनशील हृदय आणि ...

Public Welfare Mother Ahalyabai Holkar | लोककल्याणकारी माता अहल्याबाई होळकर

लोककल्याणकारी माता अहल्याबाई होळकर

Next

एन्ट्रो- पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचा ३१ मे रोजी जन्मदिन. यानिमित्ताने युद्ध नको ...शांती हवी म्हणणारे संवेदनशील हृदय आणि युद्ध टाळून शांतता कायम ठेवली. राज्य समृद्धशाली बनवले. अशा कर्तृत्वान शक्तीचा हा परिचय...

चाळीसगाव शाखा राष्ट्र सेवादल संघटनेच्यावतीने गेल्या दहा-बारा वर्षांपासून ८ ते १० मार्च जागतिक महिला दिन ते सावित्रीमाई स्मृतिदिन सन्मान अभियान राबविले जाते. स्रीला प्रतिष्ठा माणसाची... स्री पुरुष दोघांच्या आनंदाची या ब्रीद वाक्याने ‘महिलांवरील होणाऱ्या हिंसेला नकार - एल्गार, असा कार्यक्रम घेतला जातो. त्या कार्यक्रमातील एक समारोपाचा भाग, रँलीने अहल्याईंच्या पुतळ्याजवळ जाऊन करतो. तिथे घोषणा दिल्या जातात. गाणी म्हटली जातात. नाचत, फुगडी खेळत, अहल्याबाईंच्या साक्षीने शपथ घेतली जाते.... हिंसा करणार नाही व कोणाला करू देणार नाही.

दहा-बारा वर्षांत अनेक वेळेस अहल्याबाईंची व माझी अशी भेट होत राहिली; पण विचार प्रेरणेतून त्या सतत सोबतच असतात. त्यामुळे वारंवार विचार येत राहिला. आपण अहल्याबाईंना अजून समजून घ्यायला हवे, त्यांची राजकीय भूमिका, महिला सक्षमीकरण, धार्मिक विचार, राज्यकर्तेपण, रोजगार निर्मिती असे समजून घ्यायला हवे.

अहल्याईंचा महादेवाची पिंड धरून उभा असलेला फोटो खूप म्हणजे अगदी सर्वच ठिकाणी प्रचलित आहे. काय असेल या फोटोमागील रहस्य. सकाळी उठून देवाला हात जोडणे व सर्व सक्षमतेने सांभाळण्यासाठी ताकद, मनोधैर्य दे अशी प्रार्थना करणे वैगेरे. कारण एवढ्या कुशलतेने सक्षम राज्यकारभार सांभाळणे, लोकहिताचा सतत विचार करत राहणे. नवनिर्मिती आणि कौशल्य विकास, हे मात्र एकीकडे देवाची प्रार्थना व दुसरीकडे बुद्धी कौशल्याने लोकांच्या भल्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करणे... हे अहल्याईंचे वैशिष्ट्य. अहल्याईंचे नेतृत्व लोकांनी विश्वास व आदराने स्वीकारले होते. शत्रूला घाबरून सोडण्याचे धैर्य व नमलेल्या शत्रुला माफ करून शरणात घेण्याचे सामर्थ्य दोन्ही

अहल्याईंमध्ये दिसून येतात.

अहल्याईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे. अहल्याईंना दोन भाऊ महादजी व शहाजी. माणकोजी यांच्या कुटुंबाकडे अनेक पिंढ्यापासून वतनदारी होती. कुटुंबातून आणि सोबतच वडिलांकडून राजनीतीचे मूल्य व व्यवहार शिक्षण मिळाले असावे.

अहिल्याई एकट्या कन्या होत्या. पण आई वडिलांनी मुलगी म्हणून भार, जबाबदारी असे नक्कीच वाढवले नसेल , म्हणूनच त्या मैदानातही तरबेज होत्या. घोड्यावर बसणे, भालाफेक, विविध भाषा समजून घेणे यात त्या अग्रेसर होत्या. अहल्याईंच्या आयुष्यातील जरा एक एक टप्पा समजून घेऊ या….

महिलांची फौज

अहल्याईंच्या कार्यकर्तृत्वावर मल्हाररावांचा प्रचंड विश्वास होता. मल्हाररावांच्या मार्गदर्शन व आशीर्वाद विश्वास यामुळे अहल्याई हळूहळू उत्तम प्रशासक व सैन्य बांधणीच्या कामात पारंगत झाल्या. अहल्याईंनी स्वतः सुरवातीला १७ ते १०७ स्रियांचे सैन्य उभे केले. नंतर हळूहळू सैन्य वाढत गेले. सैनिकी प्रशिक्षणाबरोबर हेरगिरी, डावपेच याचेही शिक्षण दिले. महिलांना सक्षम करण्याबरोबर साक्षरदेखील केले. हे शिक्षण देताना

अहल्याई स्व:त मैदानावर होत्या. त्यांनी पडदा पद्धतदेखील नाकारली. स्वतः प्रशिक्षित होऊन पुन्हा महिलांची फौज रणांगणात लढायला उभी करणे. म्हणजे बाईला तिचे बाईपण नाजूक, कोमल, लाजाळू, कमजोर-कमकूवत बिचारी या शब्दातून बाहेर काढणे नाही का? समाजाची स्रीबद्दलची धारणा बाईने नाजूक, सुंदर असणे पुरसे. ही बदलविण्याचा हा प्रयास नाही का? आपण बाईची जात म्हणत जन्माला येताच परावलंबित्व लादणाऱ्या समाजाला दिलेली ही चेतावनी नाही का? मुलगी म्हणजे सर्वांगाणे सुंदर ठेवून डोळ्यांना छान दिसणारी वस्तू या धारणेला उत्तर नाही का?

जी घर सांभाळते ती देशाचे रक्षणदेखील सक्षमपणे करू शकते, हे उत्तर आपल्याला इथे मिळते. इंदूरवर चालून या. हत्तीच्या पायातील साखळदंड त्याच दिवशी तुमच्या पायी न अडकवले तर सुभेदारांची सून म्हणणार नाही. हे धारदार शब्द; पण युद्ध नको शांती म्हणणारे संवेदनशील हृदय, युद्ध टाळली, शांतता कायम ठेवली. राज्य समृद्धशाली बनवले.

विनोबा भावे म्हणतात, दोनशे वर्षांपूर्वी अहल्याबाईंनी सत्य, प्रेम आणि करुणा या विचारांची बीज या मातीत पेरली आहेत. या भूमितून एक ना एक दिवस त्यांचे वृक्ष उगवल्याशिवाय राहणार नाही. या विचारांची अंकुरेच मानवतेला सतत प्रेरणादायी ठरत राहतील. अहल्याबाईंनी संपूर्ण आयुष्यात जे मानवतेचे कार्य केले त्याचे अनुकरण नाही केले तर अणु-युगातील सर्वनाश अटळ आहे. अशा या लोककल्याणकारी माता अहल्याईंना त्रिवार वंदन.

Web Title: Public Welfare Mother Ahalyabai Holkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.