अडीच लाखाची लाच मागणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 04:07 PM2021-07-06T16:07:49+5:302021-07-06T16:08:37+5:30

अडीच लाखाची लाच मागणाऱ्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

Public Works Department engineers arrested for demanding Rs 2.5 lakh bribe | अडीच लाखाची लाच मागणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अटकेत

अडीच लाखाची लाच मागणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अटकेत

Next
ठळक मुद्देआदिवासी वस्तीगृहाच्या बांधकामाचे जुने बिल काढण्यासाठी मागितली लाच.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : आदिवासी वस्तीगृहाच्या बांधकामाचे जुने बिल काढण्यासाठी अडीच लाखाची लाच मागणाऱ्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

अमळनेर तालुक्यातील आदिवासी वसतिगृहाचे बांधकामाचे जुने प्रलंबित बिल काढण्यासाठी उपविभागीय अभियंता वर्ग १ दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधलीकर यांनी ठेकेदाराकडून २ लाख ५८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

ठेकेदाराने धुळे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी करून लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील कुऱ्हाडे, प्रकाश झोडगे, मनजितसिंग चव्हाण व पथकाने दिनेश पाटील यांना सकाळी धुळ्याहून त्यांच्या निवासस्थानी तर सत्यजित गांधलीकर यांना अमळनेर येथील कार्यालयातून अटक केली आहे.

Web Title: Public Works Department engineers arrested for demanding Rs 2.5 lakh bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.