ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 03:09 PM2020-08-23T15:09:24+5:302020-08-23T15:09:41+5:30
‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
फैजपूर, ता.यावल : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लासूर (ता.चोपडा) येथील नटेश्वर तीर्थ क्षेत्रावर आधारित पंकज महाजन लिखित ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन सतपंथ मंदिर संस्थानमध्ये महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आले.
परोपकारी ऋषी महर्षी अगस्ती महाराजांचे दक्षिण भारतात मोठमोठी भव्य आश्रम असून, त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटरवर सातपुड्याच्या कुशीत आहे. याठिकाणी श्रीराजगुरू श्रीवास्तव स्वामींनी रामजन्माच्या अगोदर रामकृपा व दर्शन हेतूने हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. त्यांनी व श्री रामदास स्वामी यांच्या दर्शनाने हा ग्रंथ लिहिला गेला, असे पंकज महाजन यांनी मनोगतात सांगितले.
प्रकाशन सोहळ्याला लासूर येथील सुरेशनाथ महाराज, आकाश फडे, सरपंच किशोर सुखदेव माळी, तंटामुक्ती अध्यक्ष व मुख्याध्यापक ए.के.गंभीर, उपाध्यक्ष उपेंद्र साहेबराव पाटील, लासूर राममंदिर संस्थानचे गादीपती रमेश महाजन तसेच मोहन अंबिकाप्रसाद तिवारी, निरंजन भालचंद्र चौधरी, अविनाश सुभाष शिंपी, राजेंद्र नन्नवरे, अशोक लाडवंजारी, भिकन महाजन, दीपक महाजन, धर्मेंद्र महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र पाटील तर आभार निरंजन चौधरी यांनी मानले.