सुधा खराटे लिखित ह्यअबोल झाली सतारह्ण कथासंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:33 PM2020-11-20T17:33:51+5:302020-11-20T17:34:13+5:30
प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावल : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या आई चंद्रभागाबाई सीताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मारवड, ता. अमळनेर महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय महाजन होते. प्रमुख अतिथी आशा पाटील व मंगला पाटील होत्या.
येथील महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. सुधा खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले.
डॉ. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, 'अबोल झाली सतार' या संग्रहातील कथांमध्ये मानवी जीवनातील विविध प्रसंग व घटनांचे वास्तववादी दर्शन घडते. भाव-भावनांचे सहज व स्वाभाविक चित्रण या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रा. खराटे यांचे 'नजराणा' व 'अनोखी मैत्री', 'संध्याछाया' आणि 'मनवा' हे तीन ललित गद्यसंग्रहदेखील यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत. 'नजराणा' या कथासंग्रहासाठी तर त्यांना सन २०१६ चा स्व. बाबासाहेब के. नारखेडे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या या नव्या पुस्तकास प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, योगशिक्षिका सुरेखा काटकर, डॉ. सुधीर कापडे, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. मनोज पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.