आधी खड्डे बुजवा, तरच भुयारी गटारीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:20 PM2019-11-21T13:20:51+5:302019-11-21T13:21:06+5:30

जळगाव : अमृत अंतर्गत जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. ...

 Pull up the pits first, then work the subway | आधी खड्डे बुजवा, तरच भुयारी गटारीचे काम

आधी खड्डे बुजवा, तरच भुयारी गटारीचे काम

Next

जळगाव : अमृत अंतर्गत जून २०१७ मध्ये मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचा कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. शिवाजीनगर भागातून या कामाला सुरुवात होणार होती. मात्र, भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व अ‍ॅड. दिलीप पोकळे यांनी आधी पाणी पुरवठा योजनेतंर्गत झालेल्या खड्डयांची दुरुस्ती करा त्यानंतरच भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात करा अशी तंबी दिली. त्यामुळे मक्तेदारही काम करण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे.
अमृत योजनत भुयारी गटारीच्या कामाचे भूमिपूजन आॅगस्ट महिन्यात झाले. मात्र, दोन महिन्यांपासून पाईपलाईन खोदण्याचा कामाला सुरुवात झालेली नाही. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्याचे काम शिवाजीनगर भागातून सुरु होणार आहे. अमृत योजनेमुळे आधीच रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्या व्यतिरिक्त मनपाकडूनही मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होत नाही.
अशा परिस्थितीत भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली. तर रस्त्यांचे पुन्हा खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे रहिवाश्यांना पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे. या कामाला सुरुवात करण्याआधी खोदकाम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था, त्यासाठीचा निधी मंजूर करूनच कामाला सुरुवात अशी तंबी प्रभाग क्रमांक १ व २ मधील नगरसेवकांनी मक्तेदाराला दिली आहे.
पहिल्या टप्प्यात या भागात होणार काम
१४३ कि.मी होणाऱ्या पहिल्या टप्प्याचा कामात शहरातील दुध फेडरेशन इंद्रप्रस्थ नगर, खडके चाळ, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन पासून कांचन नगर, शंकर अप्पा नगर, ज्ञानदेव नगर, कालींका माता चौक, अजिंठ चौक, मेहरूण, मोहाडी रोड, मोहन नगर, गणपती नगर, आकाशवाणी चाौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक व नेहरू चौक पर्यंतच्या येणाºया सर्व मधल्या भागात पहिल्या टप्प्याचे काम होणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने शहरात काम होणार आहे.

प्रशासनाकडून पाहिजे हमी... अमृत पाणी पुरवठा योजनेतंर्गत रस्त्यांचे खोदकाम झाले. मात्र, व्यवस्थितपणे या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. भुयारी गटार योजनेतंर्गत मुख्य रस्त्यांचा मधोमध ३ ते ६ फुटाचे खोदकाम केले जाणार आहे. हे खोदकाम झाल्यानंतर पुन्हा दुरुस्तीसाठी मक्तेदार लक्ष देत नाही. त्यामुळे शुक्रवारी होणाºया स्थायी समितीच्या सभेत मनपाकडून खोदकाम झाल्यानंतर तत्काळ डांबरने रस्त्यांची दुरुस्तीचे आश्वासन मिळाले तरच या योजनेच्या कामाला सुरुवात करू देवू असा इशारा नगरसेवक नवनाथ दारकुंडे व अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी दिला आहे.

३० महिन्यांपैकी २ महिने गेले वाया
अहमदाबाद येथील एलसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला ही निविदा देण्यात आली आहे. ३० महिन्यात हे काम पुर्ण करायचे आहे. मात्र, त्यापैकी २ महिने होवूनही कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता २८ महिन्यात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. भुयारी गटार योजनेला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, निविदांच्या घोळमुळे तब्बल दोन वर्षानंतर या कामासाठी निविदा देण्यात आली आहे.

Web Title:  Pull up the pits first, then work the subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.