समांतर रस्त्यांसाठी गडकरींना घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:44 AM2017-02-03T00:44:31+5:302017-02-03T00:44:31+5:30

एक नागरिक मंचचा पुढाकार : मनपा आयुक्तांकडून घेतली माहिती; उद्या जाहीरसभा

Pulled up for parallel roads | समांतर रस्त्यांसाठी गडकरींना घालणार साकडे

समांतर रस्त्यांसाठी गडकरींना घालणार साकडे

Next

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही पावले उचलली जात नसल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल़े आता या समांतर रस्त्यांसाठी एक नागरिक मंचने पुढाकार घेतला असून यासाठी मंचचे पदाधिकारी केंद्रीयभूप्रृष्ठमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालणार आह़े याच विषयावर मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़े
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आह़े या महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा अधिक समावेश आह़े खोल साईडपट्ट्या, महामार्गावरील खड्डे, अरूंद रस्ता यामुळे अपघातात नाहक निष्पांपाचा बळी जात आह़े  सर्वपक्षीय तसेच संस्था पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन देवून दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या समस्येवर पर्यायी उपाययोजनेसाठी साकडे घातले होत़े यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अधिका:यांच्या बैठक घेवून समांतर रस्त्याचा विषयाला हात घालण्यात आला़ जैन इरिगेशनच्या सहकार्याने महापालिका प्रशासनातर्फे राष्ट्रीय महामार्गालगत अभियांत्रिकी महाविद्यालय ते अग्रवाल चौक व चौफुली, इच्छादेवी ते अजिंठा चौफुली या समांतर रस्ते सपाटीकरणाचे काम केल़े काही दिवसानंतर हे काम थांबले. आता सपाटीकरण झालेल्या जागेवर अतिक्रमणे वाढत आहेत.
आयुक्तांकडून घेतली माहिती
समांतर रस्त्यांसाठी नागरिकांनी एकत्र यावे, जनजागृती व्हावी, यासाठी मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौक, नवीपेठ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़े यात नागरिकांच्या तक्रारी तसेच मते जावून घेवून समांतर रस्त्यांसाठी पुढची दिशा ठरविण्यात येणार आह़े या समांतर रस्त्यांबाबतच्या आवश्यक माहितीसाठी गुरूवारी विराज कावडीया, विनोद देशमुख, मितेश गुजराथी, मुविकराज कोल्हे या पदाधिका:यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली़
समांतर रस्ते महामार्ग विभागाकडून पालिकेकडे वर्ग करण्यात आलेले नाहीत़ वर्ग झाल्यावरही बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपा हे काम करू शकत नाही, असे आयुक्तांनी पदाधिका:यांना सांगितल़े आता माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवून लवकरच  नितीन गडकरी यांची भेट घेणारअसल्याचेविराजकावडीयायांनीलोकमतलासांगितल़े


शहरातून जाणा:या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रस्तावित समांतर रस्त्यांसाठी आपण सहा वर्षापासून पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी उपोषण केले, महापालिकेच्या सभागृहात विषय गांभीर्याने मांडला पण उपयोग झाला नाही. त्यामुळे या लढय़ात जनसहभाग असावा या उद्देशाने आता लोकांना बरोबर घेऊन समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा  करीत आहोत. एक नागरिक मंच हा जनतेचा असेल. त्यात कोणीही राजकारणी नाही. लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा दबाव आणण्याचा या माध्यमातून प्रय} असून सभेस नागरिक येऊन भविष्यात नियोजन ठरविले जाईल.   
-अनंत जोशी, नगरसेवक

समांतर रस्ते हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. रस्त्यांसाठी जागा आहे, काही ठिकाणी रस्ते अस्तित्वातही आहेत पण काही ठिकाणी गायब झाले आहेत. हा रस्ता नियोजनानुसार पूर्ण व्हावा असेच आमचे प्रय} आहेत. हा विषय एकटय़ा व्यक्तीच्या पुढाकारातून निश्चितच होणार नाही. त्यामुळे सभा घेऊन जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आमचा आहे. चौपदरीकरण, उड्डाणपूल, सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे रूंदीकरण असे किती तरी आश्वासन मिळाले असले तरी प्राधान्य हे समांतर रस्त्याला असून आमचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.       
-विराज कावडिया


शहरातून जाणा:या महामार्गावर प्रमुख चौकात उड्डाणपूल होणार, महामार्ग रूंद केला जाणार, चौपदरीकण होणार या घोषणा आता स्वपAवत वाटू लागल्या आहेत. ते होईल तेव्हा होईल पण मग तोर्पयत निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय? असा माझा शहरवासीयांना सवाल असून त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन लढा पुकारणे हाच मुळ उद्देश आहे. रस्ते पक्के होऊ शकत नसतील तरी ठिक पण कच्चे रस्ते करून ते सलग असावेत अशी अपेक्षा आहे.  आमची सभा ही समांतर रस्ते व्हावेत या साठीच आहे. त्यासाठी प्रथम नागरिकांची बोलावून सभा घेणे, त्यानंतर भविष्यातील धोरण ठरविले जाईल.      -पियुष पाटील.

Web Title: Pulled up for parallel roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.