यास चक्रीवादळामुळे पुणे - हावडा एक्स्प्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:16 AM2021-05-24T04:16:08+5:302021-05-24T04:16:08+5:30
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव : स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या ...
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव : स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या जळगाव परिमंडळ शाखेच्यावतीने शासनाच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द केलेल्या आदेशाच्या निषेधार्थ नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झोन सचिव चेतन तायडे, सुमंत मुंढे, प्रमोद अहिरे, कैलास पाटील, सर्कल अध्यक्ष सुरेंद्र डांगे, सचिव विक्रांत सिंग, प्रमोद गजभिये, केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश पाचंगे, उमेश घुगे उपस्थित होते.
उपमहापौरांनी केली प्रभाग १०मधील समस्यांची पाहणी
जळगाव : प्रभाग क्रमांक १०मधील पिंप्राळा परिसरातील नामदेव नगर भागात उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत, प्रभागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासनातर्फे शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.